पानसरे हत्या प्रकरणी नववा आरोपी शरद कळसकरला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणांमधील नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पानसरे हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी त्याने कोल्हापूरमध्ये वास्तव्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

संदीप राजगोळकर संदीप राजगोळकर | News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 04:07 PM IST

पानसरे हत्या प्रकरणी नववा आरोपी शरद कळसकरला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी

कोल्हापूर, 11 जून- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणांमधील नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पानसरे हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी त्याने कोल्हापूरमध्ये वास्तव्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शिवाय त्याच्याकडे हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या पिस्तुलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी माहिती मंगळवारी कोल्हापूर एसआयटीने कोर्टाला दिली आहे.

कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर एसआयटीने तपास करत यापूर्वी आठ आरोपींची नावे समोर आणली आहेत. यातील सात आरोपींना यापूर्वीच अटक दाखवली असून विनय पोवार आणि वीरेंद्र तावडे हे दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत.

आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी कोर्टासमोर अनेक पुरावे सादर केले.

कॉम्रेड पानसरे यांच्यावर गोळीबार झाला त्या घटनेच्या अगोदर पाच ते सहा दिवस जंभोटी, किणये (ता. बेळगाव ) येथे झालेले प्रशिक्षण व त्या रात्री बेळगाव एसटी स्टॅंडवर कॉम्रेड पानसरे हत्त्येच्या कटाची झालेली बैठक याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास करून त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेली अनोळखी तीन व्यक्तींबाबत त्यांच्याकडे तपास करणे गरजेचे आहे.

या शिवाय शरद कळसकर याने बेळगाव तसेच कोल्हापूर येथे पिस्तूल तयार करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने तयार केलेल्या पिस्तूलचा वापर या गुन्ह्यात झाला आहे का याबाबत सुद्धा तपास करणे गरजेचे आहे. गुन्ह्यात गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल घटनेपूर्वी कोणाकडे ठेवले होते. कोल्हापूरमध्ये कोणी आणि कोणाकडे आणून देणे याचा शोध घ्यायचा आहे.

Loading...

आजपर्यंत गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे...

1) समीर विष्णू गायकवाड

2) वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे

3) विनय बाबुराव पोवार

4) सारंग दिलीप अकोळकर

5) अमोल अरविंद काळे

6) वासुदेव भगवान सूर्यवंशी

7) भरत जयवनच्या कुरणे

8) अमित रामचंद्र देगवेकर

9) शरद भाऊसाहेब कळसकर


गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...