पानसरे हत्या प्रकरण : महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची उलगडण्याची शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून अमोल काळे याचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी प्रयत्नशील होती.

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 03:23 PM IST

पानसरे हत्या प्रकरण : महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची उलगडण्याची शक्यता

कोल्हापूर, 15 नोव्हेंबर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अमोल काळे याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पानसरे हत्येप्रकरणातील महत्त्वपूर्ण बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

अमोल काळेला चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर एसआयटीकडून कोर्टात करण्यात आली होती. कोर्टाने आता त्याला सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.

सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

अमोल काळे याच्याकडे सापडलेल्या डायरीमध्ये सांकेतिक भाषेमध्ये कशाचा उल्लेख करण्यात आला आहे, ते डिकोड करायचं आहे

डॉ कलबुर्गी आणि गोविंद राव पानसरे यांच्या हत्येमध्ये वापरलेले शस्त्र एकच

Loading...

पानसरे हत्येमध्ये वापरलेल्या गोळ्या आणि पत्रकार गौरी लंकेश हत्येमध्ये वापरलेल्या गोळ्या एकसारख्याच

कोण आहे अमोल काळे?

अमोल काळे हा सनातन संस्थेचा साधक असून तो कर्नाटक राज्यातील सीआयडीच्या ताब्यात होता. त्याचा ताबा महाराष्ट्र एसआयटीने घेतला असून आज (गुरुवारी) अमोल काळे याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं गेलं.

गेल्या अनेक दिवसांपासून अमोल काळे याचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी प्रयत्नशील होती. या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय अमोल काळेला कुठली कोठडी सुनावणार याची उत्सुकता होती.

अखेर कोर्टाने अमोल काळेला पोलीस कोठडी सुनावली आहे. आता त्याच्याकडून कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाबाबत काही खुलासे होतात का, हे पाहावं लागेल.


VIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजीबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 03:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...