S M L

अण्णांच्या राळेगण सिद्धीमध्ये सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

दिल्लीत होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत येणाऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय. अण्णांच्या या आरोपानंतर राळेगणसिद्धीतल्या ग्रामस्थांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे, बसेस रद्द करण्यात येत आहेत यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 23, 2018 06:00 PM IST

अण्णांच्या राळेगण सिद्धीमध्ये सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

23 मार्च:  अण्णा हजारे दिल्लीत आंदोलन करत असतानाच   त्यांच्या राळेगण सिद्धीमध्ये   सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलाय.  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आज सकाळी  दिल्लीतल्या रामलीला मैदानातून सुरुवात झालीय.

दिल्लीत होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत येणाऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय. अण्णांच्या या आरोपानंतर राळेगणसिद्धीतल्या ग्रामस्थांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे, बसेस रद्द करण्यात येत आहेत यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत.  अहमदनगर जेष्ठ सेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनाला येणाऱ्या कार्यकर्त्यांचा रेल्वे सरकारने अचानक रद्द केल्या गेल्या. तर अनेक राज्यात बसेस रद्द  केल्या आहेत  असा आरोप अण्णांनी  केलाय.

गेली अनेक वर्ष लोकपाल विधेयकासाठी अण्णा आंदोलन करत आहेत. आधीच्या सरकारने आणि आताच्या सरकारांनी  दोघांनीही  याबाबत सामान्यांची निराशा केलीय. अजूनतरी लोकपालची अंमलबजावणी झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2018 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close