शासनाने सरकारी हॉस्पिटलचे थकवले 90 कोटी, नाही फेडले तर...

शासनाने सरकारी हॉस्पिटलचे थकवले 90 कोटी, नाही फेडले तर...

सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणा-या रूग्णांनो आता जरा सावधान.

  • Share this:

प्राजक्ता पोळ, प्रतिनिधी

मुंबई, 20 सप्टेंबर: सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणा-या रूग्णांनो आता जरा सावधान. कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये होणा-या शस्त्रक्रियेच्या उपकरणांचा आणि जीवरक्षक औषधांचा पुरवठा थांबणार आहे. होय, ऑल इंडिया फुड ड्रग लायसन होल्डर फाऊंडेशननं हा निर्णय घेतलाय. शस्त्रक्रियेसाठी लागणा-या साहित्य, औषधं यांच्या उत्पदकांचे आणि पुरवठादारांचे 90 कोटी रुपये 2015 पासून महाराष्ट्र शासनाकडे थकलेत. त्यामुळे उपकरणांचा आणि औषधांचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

येत्या आठवडाभरात जर हे पैसे दिले गेले नाहीत तर शस्त्रक्रियेसाठी लागणा-या उपकरणांचा आणि औषधांचा पुरवठा थांबवणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. जर हे पैसे वेळीच दिले नाहीत तर याने आरोग्य सेवा थांबल्या सारखीच होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांचे हाल मोठे हाल होतील.

हे कर्ज नाही फेडलं तर कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य जसे सर्जिकल इन्स्ट्रमेंटस्, सर्जिकल ड्रेसिंग्ज तसंच आयव्हि फ्लुईडस् (ग्लुकोज), अँटीबायोटिक इंजेक्शनस्, जीवरक्षक औषधे यांचा पुरवठा थांबवण्यात येणार आहे. याचा सगळ्यात मोठा फटका हा सर्वसामान्यांना बसणार आहे.

शासनाने केलेल्या या कर्जाचं परिणाम सर्वसामान्यांना होणार आहे. पण दरम्यान, 2015पासूनचे पैसे थकतातच कसे असा सवाल आता विचारण्यात येतोय. त्यामुळे यासगळ्यावर आता महाराष्ट्र शासन काय निर्णय घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

रडण्याचे असेही आहेत महत्त्वपूर्ण फायदे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 05:45 PM IST

ताज्या बातम्या