S M L

VIDEO : सरकारने बीडला वाऱ्यावर सोडलं आहे का? -धनंजय मुंडे

सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शुन्यच असल्याचा आरोप मुंडे यांनी केला

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2018 08:00 PM IST

VIDEO : सरकारने बीडला वाऱ्यावर सोडलं आहे का? -धनंजय मुंडे

शशी केवडकर, प्रतिनधी

 

बीड,07 नोव्हेंबर :  सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शुन्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.सरकारने सर्वाधिक दुष्काळग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्याला तर वार्‍यावरच सोडले आहे का काय ? असा प्रश्‍न उपस्थित करताना कदाचित इथल्या पालकमंत्री विदेशात असल्याने मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यात आढावा बैठका घेतात मात्र बीड जिल्ह्याला टाळत असावेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.


Loading...


विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे ऐन दिवाळी सणात दुष्काळग्रस्त जनतेसोबत त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दुष्काळी दौरा करीत आहेत. मंगळवारी अंबाजोगाई तालुक्याच्या पाहणी दौर्‍यानंतर त्यांनी आज बुधवारी परळी तालुक्यातील नागापूर भागातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.


अनेक शेतकर्‍यांच्या पाण्याअभावी वाळून जाणार्‍या उसाची तसंच कापसाच्या शेतीची त्यांनी पाहणी केली. शेतकर्‍यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षा ही भीषण आहे. सरकारने 151 तालुके दुष्काळी जाहीर केले असले तरी, शेतकर्‍यांना आर्थिक मदत, जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय मात्र काहीच केली नाही अशी टीका मुंडे यांनी केली.


नोव्हेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असताना 30 नोव्हेंबरपर्यंत टँकर लावू नका असे आदेश दिले असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. 30 नोव्हेंबर पर्यंत माणसांनी आणि जनावरांनी पिण्याच्या पाण्याअभावी मरायचे का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.


=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2018 08:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close