'हुक्का पार्लरवर लवकरच कठोर कायदा आणणार', मुख्यमंत्र्याची घोषणा

अवघी तरूणाई ज्या हुक्क्याच्या विळख्यात अडकतेय त्या हुक्का पार्लरवर कठोर निर्बंध घालणारा कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2018 08:15 AM IST

'हुक्का पार्लरवर लवकरच कठोर कायदा आणणार', मुख्यमंत्र्याची घोषणा

20 मार्च : अवघी तरूणाई ज्या हुक्क्याच्या विळख्यात अडकतेय त्या हुक्का पार्लरवर कठोर निर्बंध घालणारा कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लवकरच हा कायदा आम्ही आणू असं मुख्यमंत्र्यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. कमला मिल आग प्रकणाबाबत लक्षवेधीसूचनेवर बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

कमला मिल आग प्रकरणानंतर हुक्का पार्लरवर बंदी का नाही असा प्रश्न वारंवार समोर येत होता. हाच प्रश्न काल विरोधी पक्षाच्या आमदारांनीही विधानपरिषदेत उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना कमला मिल आग प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समितीसुध्दा नेमण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे.

हुक्का पार्लरवर जर कठोर निर्बंध आले आणि त्या कायद्यांची काटेकोरपणे अमंलबजावणी होणार असेल तर त्यामुळे हुक्का पार्लरमध्ये अडकलेली तरूणाई आणि त्यातून होणाऱ्या दुर्घटनांना आळा बसेल इतकं नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2018 08:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...