पाडव्याच्या दिवशी गुळाला चांगला दर;गुळ विक्रेते समाधानी

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2017 03:19 PM IST

पाडव्याच्या दिवशी गुळाला चांगला दर;गुळ विक्रेते समाधानी

कोल्हापूर,20 ऑक्टोबर: दिवाळीमध्ये आज पाडव्यादिवशी सगळेजण खरेदीसाठी गर्दी करतात. त्यात आजच कोल्हापूरमध्येही गुळाचे सौदे पार पडले. आणि आज या गुळाला प्रतिक्विंटल 5 हजार ते 5 हजार 600 इतका विक्रमी दर मिळाला. त्यामुळं यंदाचा गुळ उत्पादक शेतकरी आता दिवाळीमध्ये आनंदी झालाय.

वर्षभर शेतात ऊसाचं पीक घेऊन त्यापासून गुळ तयार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही आजचा पाडव्याचा दिवस महत्वाचा असतो. कारण यादिवशी गुळाचे सौदे पडत असतात. दरवर्षी कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे सौदे पार पडतात. आजही हे सौदे झाले त्यात गुळाच्या प्रतिप्रमाणे हा दर ठरवला जातो. आज पाडव्याच्या दिवशी बाजार समितीमध्ये जवळपास 20 हजार गुळ रव्यांची आवक झाली होती. त्यानंतर विक्रम खाडे यांच्या दुकानात हे सौदे करण्यात आले. यंदा पाऊस उशीरापर्यंत झाल्यामुळे अजून कोल्हापूर आणि परिसरातील सगळीच गुऱ्हाळघरं सुरु झालेली नाहीत. त्यामुळे गुळाची मोठी आवक व्हायला अजून वेळ आहे. पण एकीकडं आता काही दिवसांमध्ये ऊसाचा गाळप हंगाम सुरु होणार असतानाच आता 5 हजारांपर्यंत दर मिळाल्यानं गुळ उत्पादक आता समाधानी झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2017 03:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...