काळाचा घाला ! ट्रॅक्टर नाल्यात उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 01:34 PM IST

काळाचा घाला ! ट्रॅक्टर नाल्यात उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

गोंदिया, 28 जुलै : गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

नियंत्रण सुटल्यानंतर ट्रॅक्टर नाल्यात पडला, यामध्ये एकूण 14 लोक बसले होते. यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर हॉस्पिटलमध्ये नेलं जात असताना आणखी एकानं जीव सोडला.

(पाहा :भररस्त्यात महिलांमध्ये लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, VIDEO VIRAL)

Loading...

शनिवारपासून (27 जुलै)जिल्ह्यात पावसानं जोर धरला आहे. यामुळे शेतकरी वर्ग आपापल्या कामाला लागला आहे.

(पाहा :सिंघम स्टाईलमुळे पोलिसांची नोकरी धोक्यात, VIDEO VIRAL)

शेतीसाठी प्रत्येकाची घाई सुरू आहे. यासाठीच मजुरांना लागवड करण्यासाठी शेतावर नेलं जात असताना ही मोठी दुर्घटना घडली.

(पाहा :VIDEO: गो तस्करी करणाऱ्या ट्रक चालकाची जमावाकडून धुलाई)

चार जणांचा जागीच मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसली आहे.

भावुक क्षण! ऑपरेश 'महालक्ष्मी'मध्ये माकडाचीही सुटका, NDRF जवानाला अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...