सुवर्ण नगरीत 'सोने' खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

सोन्याची आपट्याची पानं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. अर्धा ग्रॅम, पाऊण ग्रॅम, एक ग्रॅम आणि दीड ग्रॅम वजनामध्येही सोन्याची पाने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2017 01:41 PM IST

सुवर्ण नगरीत 'सोने' खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

जळगाव, 30 सप्टेंबर: दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. म्हणून सोने खरेदीसाठी विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या जळगाव या सुवर्ण नगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळ पासूनच गर्दी केली आहे .

विजयादशमीच्या सणाला आपट्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्नेहाचं प्रतीक म्हणून आपट्याची पानं आदानप्रदान करण्याची प्रथा आहे. आता सोन्याची आपट्याची पानं जळगाव या सुवर्ण नगरीत दाखल झालेली आहे. सोने विक्रेत्यांनी सोन्याच्या कलात्मक दागिन्यांसह सोन्याची आपट्याची पानं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. अर्धा ग्रॅम, पाऊण ग्रॅम, एक ग्रॅम आणि दीड ग्रॅम वजनामध्येही सोन्याची पाने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. एकीकडे सोने खरेदीसाठी दसऱ्याला ग्राहकांमध्ये उत्साह असला तरी केंद्र सरकारच्या नव्या आदेशानुसार ५० हजाराच्या वर सोने खरेदी साठी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड सक्तीचं केलं आहे.

दसऱ्याचा मुहूर्त साधून बाहेरगावहून सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना त्यांच्यासोबत पॅन कार्ड न आणल्याने अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2017 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...