दसरा-दिवाळी जवळ आल्याने सराफा बाजारात तेजी

दसरा-दिवाळी जवळ आल्याने सराफा बाजारात  तेजी

मंगळसूत्र, टेम्पल ज्वेलरी, सोनसाखळी खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. मंगळसूत्रातील पेंडंट हिऱ्याचे बनविण्याकडे देखील कल वाढत चालला आहे. चांदीची देवाची मूर्ती, निरंजन, लक्ष्मीची प्रतिमा यांना चांगली मागणी आहे

  • Share this:

24 सप्टेंबर: नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यामुळे काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या सराफा बाजाराला मागणीची झळाली येऊ लागली आहे. नवरात्रीनिमित्त सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाली आहे. दसरा आणि दिवाळीपर्यंत त्यात आणखी वाढ होईल, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

मंगळसूत्र, टेम्पल ज्वेलरी, सोनसाखळी खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. मंगळसूत्रातील पेंडंट हिऱ्याचे बनविण्याकडे देखील कल वाढत चालला आहे. चांदीची देवाची मूर्ती, निरंजन, लक्ष्मीची प्रतिमा यांना चांगली मागणी आहे. उत्सव काळात भेट देण्यासाठी देखील या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे आत्तापासूनच लोकांनी खरेदी करण्यास आणि प्रिबुकींग करण्यास सुरूवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 10:29 AM IST

ताज्या बातम्या