दौंड रेल्वेला उपनगराचा दर्जा द्या, सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

पुणे रेल्वे विभागाअंतर्गत दौंड रेल्वेस्थानकाला उपनगराचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी लोकसभेत केली.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 08:59 PM IST

दौंड रेल्वेला उपनगराचा दर्जा द्या, सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

बारामती, 12 जुलै- पुणे रेल्वे विभागाअंतर्गत दौंड रेल्वेस्थानकाला उपनगराचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी लोकसभेत केली. याबरोबरच लोणावळा ते पुणे ते दौंडदरम्यान लोकल सेवा सुरू करून दौंड-पुणे-लोणावळा या लोहमार्गाच्या चौपदरीकरण करावे, असेही त्या म्हणाल्या. महसूल वाढीकरीता रेल्वे विभागाने जाहिरातींकरीता निश्चित केलेल्या जागा, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे खात्यासाठीचा संपूर्ण निधी खर्च करण्याच्या मुद्द्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधत बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड, बारामती, नीरा रेल्वे स्थानकांचे प्रश्न त्यांनी मांडले. याबरोबरच पुणे लोणावळा या लोहमार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी त्यांनी केली.

लोकसभेत भाषण करताना सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाच्या 2019-20 वर्षाकरीता अनुदानाची मागणी करून दरम्यान प्रवाशांसाठी दौंड ते लोणावळा मार्गावर मेमू रेल्वेसेवा सुरू करणे आणि महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एमआरआयडीसी) मुख्यालय पुण्यात स्थापन करण्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

दौंड रेल्वे स्थानकालगतच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी सुळे यांनी पुन्हा एकदा केली. बारामती आणि निरा रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण करणे आणि नुतनीकरणासोबतच पुणे ते दौंड मार्गावर सहजपूर आणि कासुर्डी ही नवी रेल्वेस्थानके सुरू करावीत. त्यासोबतच बारामती मतदारसंघातील दौंड तालुक्यातील पाटस येथे रेल्वेस्थानकावर पादचारी उड्डाणपुल उभारणीची मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. बारामती, दौंड आणि भिगवण येथील प्रवाशांसाठी स्वतंत्र आरक्षित जागांचा कोटा द्यावा. तसेच सर्व गाड्यांचा थांबा दौंड रेल्वेस्थानकावर देण्याची पुन्हा त्यांनी मागणी केली. बारामती रेल्वेस्थानकासमोरील मोकळी जागा भाडेतत्वावर देऊन नागरिकांसाठी सेवारस्ता सुरू करावा. याशिवाय शिर्सुफळ गावातील गावडे वस्ती ते सोनबा पाटील वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यालगतच्या बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.

VIDEO:धक्कादायक, मुंबईच्या सी-लिंकवरून एकाने समुद्रात मारली उडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...