धर्मा पाटील यांना 'शहीद भूमिपूत्र' शेतकऱ्याचा दर्जा द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी

धर्मा पाटील यांना 'शहीद भूमिपूत्र' शेतकऱ्याचा दर्जा द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी

वडिलांना 'शहीद भूमिपूत्र' शेतकऱ्याचा दर्जा जोपर्यंत सरकार देत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्या मुलानं घेतली आहे.

  • Share this:

29 जानेवारी : 22 जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्रशान करणारे वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला आहे. ते 80 वर्षांचे होते. वडिलांना 'शहीद भूमिपूत्र' शेतकऱ्याचा दर्जा जोपर्यंत सरकार देत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्या मुलानं घेतली आहे. दरम्यान, धर्मा पाटलांचे निकामी न झालेले अवयव दान करण्याचा निर्णयही त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

धुळे जिल्ह्यातल्या विखरण या गावचे ते होते. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी धर्मा पाटील यांनी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्यांच्या उपचारास यश आलं नाही आणि त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर काय ट्विट केलं आहे. ते म्हणाले की,

'हा सरकारी अनास्थेचा बळी आहे. या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे हजारो शेतकऱ्यांनी प्राण गमावल्यानंतरही सरकारला जाग येत नाही, हे संतापजनक आहे. '

त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनीही धर्मा पाटील यांच्या निधनावर ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, 'न्यायासाठी मंत्रालयात येऊन जीवनातील शेवटचा संघर्ष त्यांनी केला तरी सरकारला त्यांना न्याय द्यावा वाटला नाही. या मृत्यूस केवळ आणि केवळ सरकारच जबाबदार आहे.'

काय आहे संपूर्ण प्रकरण?

- धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातल्या विखरण गावातील शेतकरी

- औष्णिक वीज प्रकल्पासाठी त्यांची 5 एकर जमीन संपादित केली

- केवळ 4 लाख रुपये भरपाई

- 4 एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं

- विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती

- इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी

- गेल्या 3 महिन्यांपासून पाठपुरावा

- अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तर मिळालं नाही

- 22 जानेवारीला मंत्रालयात केलं विषप्राशन

- घटनेनंतर सरकारकडून कुटुंबीयांना 15 लाखांचं सानुग्रह अनुदान

- अनुदान नको, मोबदला द्या; पाटील कुटुंबीयांची मागणी

- 29 जानेवारीला उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज अपयशी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2018 08:35 AM IST

ताज्या बातम्या