सगळाच सावळा गोंधळ, शिक्षकच नसल्याने 100 विद्यार्थिनींनी सोडली शाळा

सगळाच सावळा गोंधळ, शिक्षकच नसल्याने 100 विद्यार्थिनींनी सोडली शाळा

गडचिरोली जिल्ह्यात समाज कल्याण विभागाकडुन अनुसूचित जातीच्या मुलीसाठी दोन निवासी शाळा चालवल्या जातात त्यात हा गोंधळ दिसून आला.

  • Share this:

महेश तिवारी, गडचिरोली 20 जुलै : गडचिरोली सारख्या आदिवासी भागात सरकार कोट्यवधींच्या योजना जाहीर करतं मात्र प्रत्यक्षात त्यातलं फारसं काही होत नाही. समाज कल्याण विभागाच्या कारभाराचा भोंगळ नमुना आज बघायला मिळाला. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथील निवासी शाळेत  महिला अधिक्षकेसह  महिला शिक्षिका नसल्याने शंभर विघार्थिनींनी आज शाळा सोडून गावाकडे धाव घेतलीय. गडचिरोली जिल्ह्यात समाज कल्याण विभागाकडुन अनुसूचित जातीच्या मुलीसाठी  दोन निवासी शाळा चालवल्या जातात त्यात हा गोंधळ दिसून आला.

गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा, नराधम प्रियकर आणि ब्लॅकमेल करणारा शिक्षक फरार

सिरोंचा येथील समाजकल्याण विभागाच्या  निवासी  शाळेतील सिरोंचा अहेरी तालुक्यातल्या मुली शिकायला आहेत या मुलींसाठी या शाळेत एकही महिला शिक्षिका नाही. धक्कादायक म्हणजे शिक्षिका नसताना या निवासी शाळेच्या वस्तीगृहात  सहा वर्षापासुन महिला अधीक्षीका  नसल्याचे समोर आलं आहे दोनशे मुली शाळेत असताना त्यांच्यासाठी महिला अधिक्षिका नसल्याने वस्तीगृहातल्या मुलींची सुरक्षा धोक्यात आलीय. महीला शिक्षिकाही नसल्याने शाळा बंद पाडण्याचा  मुलींनी गेल्या आठवड्यात इशारा दिला होता.

मोठ्या हॉटेल्समध्ये मटण म्हणून दिलं जातं कुत्र्यांच मांस, FIR दाखल

गेल्याच आठवड्यात या निवासी शाळेत मुलींना अळ्यायुक्त जेवण मिळत असल्याचा प्रकार उघड झाला होता सलग पाच दिवस या मुलींना अशा पध्दतीचे जेवण खावे लागले. शाळेत महीला शिक्षिकेसह अधिक्षिका नेमण्यासाठी जो इशारा आणि वेळ मुलींनी दिला होता ती निघून  गेल्याने आज या मुली आज शाळा सोडून परत आपल्या गावी निघून गेल्या.

या मुलींनी गेल्या 17 जुलै रोजी  पत्र देऊन इशारा दिला होता की  20 तारखेपर्यंत अधिक्षिका उपलब्ध न झाल्यास आम्ही शाळा बंद करू व परत गावी  जाऊ. त्याप्रमाणे  आज सकाळी 20 ते 25 मुली परत गेल्या तर नंतर शंभरच्यावर मुली शाळा सोडून घरी गेल्या आहेत.

OMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह!

अधिक्षक रूजू झाल्यास  परत येवू नाही तर शिक्षण-बंद शिक्षण-करू असा इशाराही पालकांनी दिलाय. अधिक्षक नसल्याने या वस्तिगृहात शिक्षण घेत असलेलया मुलींची सुरक्षा धोक्यात आली होती. त्यामुळे कंटाळून मुलींनी हा निर्णय घेतलाय. समाज कल्याण विभागाने तातडीने कारवाई करत सर्व व्यवस्था करावी अशी मागणी विविध संघटनांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gadchiroli
First Published: Jul 20, 2019 09:19 PM IST

ताज्या बातम्या