छेड काढणाऱ्यांना मुलींनीच दिला चोप, पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसांसमोरही धुतले

औरंगाबादमध्ये मात्र एका शाळकरी मुलींच्या ग्रुपने छेडछाड करणाऱ्या मुलांना चांगलाच चोप देत तेट पोलीस स्टेशन गाठले.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 15, 2017 05:34 PM IST

छेड काढणाऱ्यांना मुलींनीच दिला चोप, पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसांसमोरही धुतले

15 डिसेंबर : काल पुण्यात एका मुलीची खुलेआम छेडछाड करणारी क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्ये मुलगी छेडछाड करणाऱ्या मुलांना प्रतिकार करत नव्हती ती घाबरली होती. औरंगाबादमध्ये मात्र एका शाळकरी मुलींच्या ग्रुपने छेडछाड करणाऱ्या मुलांना चांगलाच चोप देत थेट पोलीस स्टेशन गाठले.

औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरात ऑटो रिक्षामधून जातांना या एका टवाळखोर मुलांनी रस्त्याच्याकडेनं जाणाऱ्या मुलींवर शेरेबाजी केली. त्यामुळे संतापलेल्या मुली काही गप्प बसल्या नाहीत त्यांनी त्या रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षा अडवली आणि मुलांना चोप द्यायला सुरुवात केली. रिक्षाचालक मध्ये पडायला पाहत होता. पण मुलींनी त्यालाही फटके देण्याची तयारी केली. मुलींचा रुद्रावतार पाहून रिक्षावाल्याने रिक्षा चुपचाप वाळूज पोलीस ठाण्यात नेली. संतापलेल्या मुली रिक्षासोबतच पोलीस ठाण्यात धडकल्या आणि पोलीस ठाण्यातच त्यांनी रोड रोमियांना पुन्हा फटके द्यायला सुरुवात झाली.

पोलीसही चक्रावले कारण या एवढ्या संतापल्या होत्या त्यांनी पोलिसांसमोरच या मुलांना फटके मारत आत नेले. मुली आणि छेडछाड करणारे दोघे अल्पवयीन असल्याने पोलीस काय करवाई करतात याकडे लक्ष आहे. मात्र, या मुलींच्या रुद्रावतार पाहुन ही मुलं कधी मुलींच्या वाटेला जातील असं वाटत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...