प्रेयसीने मारला प्रियकराच्या गुप्तांगावर दगड, आईच्या तक्रारीवरून तरूणीविरूद्ध गुन्हा

प्रेयसीने मारला प्रियकराच्या गुप्तांगावर दगड, आईच्या तक्रारीवरून तरूणीविरूद्ध गुन्हा

प्रियकराने प्रेयसीला मारहाण केल्याचा घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र, अमरावती शहरात चक्क प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर दगडाने मारहाण केल्याची विचित्र घटना घडली आहे.

  • Share this:

अमरावती, 24 जुलै- प्रियकराने प्रेयसीला मारहाण केल्याचा घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र, अमरावती शहरात चक्क प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर दगडाने मारहाण केल्याची विचित्र घटना घडली आहे. पीडित तरूणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर आरोपी तरुणीवर गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण?

पीडित तरूण अर्जुन नगर परिसरात राहतो. तो एमएस्सीचे शिकण घेत आहे. तरूणाचे मागील 3-4 वर्षांपूर्वी आरोपी तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणीच्या विचित्र स्वभावामुळे तरुणाने तिच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकले होते. तिचा पिच्छा सुटावा म्हणून त्याने कॉलेज देखील बदलले होते. मात्र, तरुणी त्याचा पिच्छा सोडण्यात तयार नाही. तरुण असलेल्या कॉलेजमधेच तिनेही अ‍ॅडमिशन घेतले. मंगळवारी (23 जुलै) तरुण त्याच्या मित्रांसोबत कॉलेजमध्ये उभा असताना तरुणीने त्याला शिवीगाळ केली. वाद होऊ नये म्हणून तरुण घरी जायला निघाला असता अर्जुन नगरात आरोपी तरूणीने त्याच्या गाडीला जोरदार धडक दिली. एवढेच नाही तर तरुणाच्या गुप्तांगावर तिने दगडाने मारहाण केली. तरूणाला रक्तबंबाळ अवस्थेत डॉ.बोंडे यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तरूणावर सद्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत. तरूणाच्या आईच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी तरुणीविरुद्ध भादंवि कलम 324, 326 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SPECIAL REPORT : प्रिया वारिअरच किस झाला मिस, असं काय घडलं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2019 11:05 PM IST

ताज्या बातम्या