ब्लेडने हात कापून गर्लफ्रेंडच्या कपाळाला लावले रक्त, नंतर सेल्फी घेऊन केली हत्या

ब्लेडने हात कापून गर्लफ्रेंडच्या कपाळाला लावले रक्त, नंतर सेल्फी घेऊन केली हत्या

कल्याण स्टेशन परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये झालेली तरुणीची हत्या आणि तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

  • Share this:

कल्याण, 21 जुलै- कल्याण स्टेशन परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये झालेली तरुणीची हत्या आणि तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत प्रेमीयुगुल होते. प्रियकराने प्रेयसीला नव्या नवरीसारखे सजवले. कपाळाला सिंधूरऐवजी स्वत:चा हात कापून रक्त लावले. तिच्यासोबत सेल्फी क्लिक केला आणि नंतर तिची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून ब्लेड जप्त केले आहे.

कल्याण येथील नीलम गेस्ट हाऊसमध्ये शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारस ही घटना उघडकीस आली. प्रतिमा प्रसाद (वय-20, रा. मुंबई) असे मृत तरुणीचे तर अरुण गुप्ता (वय-20, रा.आजमगड) तरुणाचे नाव आहे. लॉजमध्ये एकाच रूममध्ये दोघे मृतावस्थेत आढळून आले होते. या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता पोलिसांना घटनास्ठळी एक मोबाइल सापडला आहे. त्यात मृत प्रतिमा आणि अरुण एक सेल्फी आढळला. त्यात प्रतिमाच्या कपाळावर रक्त दिसत आहे. त्यावरून अरूणने तिची हत्या करण्यापूर्वी सेल्फी घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे.

फेसबुकवर झाली होती मैत्री..

पोलिसांनी सांगितले की, अरुण हा उत्तर प्रदेशातील आजमगड येथील रहिवासी होता. 12 वीपर्यत शिक्षण घेतल्यानंतर तो वडिलांनी व्यवसायात मदत करत होता. दुसरीकडे, प्रतिमा ही मुंबईची रहिवासी होती. ती एका बॅंकेत नोकरी करत होती. डिस्टेंस एज्युकेशनच्या माध्यमातून ती एमकॉमचे शिक्षण घेत होती. फेसबुकवर दोघांची मैत्री झाली होती.

अरुणच्या वडिलांनी सांगितले की, वाराणसी जात असल्याचे सांगून अरूण घरातून निघाला होता. बनारसहून तो शुक्रवारी रेल्वे एक्स्प्रेसने मुंबईला आला. कल्याण रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर प्रतिमा त्याल भेटली. दुपारी दीड वाजता दोन्ही नीलम गेस्ट हाऊसवर पोहोचले. हॉटेल स्टाफने सांगितले की, एकदा खोलीत गेलेले दोघे खोलीतून बाहेर निघाले नाही. सायंकाळी साडेसात वाजता त्यांनी पाणी मागितले. रात्री साडे नऊ वाजता जेवणासाठी हॉटेल स्टाफने अरूण आणि प्रतिमाला आवाज दिला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर हॉटेल मॅनेजरने पोलिसांना माहिती दिला.

पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला असता प्रतिमा बेडवर मृतावस्थेत पडली होती तर अरुणचा मृतदेह सीलिंग फॅनला लटकलेला होता. अरुणने आत्महत्या करण्याआधी प्रतिमाचा गळा आवळून हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2019 10:53 PM IST

ताज्या बातम्या