धुळ्यात बेशिस्त वाहतुकीने घेतला शाळकरी मुलीचा बळी

धुळे शहारात बेशिस्त वाहतुकीने एका शाळकरी मुलीचा बळी घेतला आहे. साक्री रोडवरील भरधाव येणाऱ्या ट्रकने गुंजन देविदास पाटील या शाळकरी मुलीला जोरदार धडक दिल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 08:02 PM IST

धुळ्यात बेशिस्त वाहतुकीने घेतला शाळकरी मुलीचा बळी

दीपक बोरसे, (प्रतिनिधी)

धुळे, 25 जुलै- धुळे शहारात बेशिस्त वाहतुकीने एका शाळकरी मुलीचा बळी घेतला आहे. साक्री रोडवरील भरधाव येणाऱ्या ट्रकने गुंजन देविदास पाटील या शाळकरी मुलीला जोरदार धडक दिल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.

गुंजन ही कमलाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी असून ती नववी इयत्तेत शिकत होती. गुंजनची शाळा दुपारची असल्याने ती शिकवणीसाठी जात असताना ही दुर्देवी घटना घडली. गुंजन सायकलीने शिकवणीला जाण्यास निघाली होती. यावेळी सिंचन भुवनसमोर रस्ता ओलाडतांना भरधाव येणाऱ्या ट्रकने गुंजनला जोरदार धडक दिली. ट्रकच्या चाकांखाली चिरडली गेल्याने गुंजनचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघातस्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. गुंजन ही हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेचे गांभिर्य ओळखून ट्रकचालक स्वत:हून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. या अपघातामुळे मात्र पुन्हा बेशिस्त वाहतुकीच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबादेतील विवाहितेवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार

दुसऱ्या एका घटनेत औरंगाबाद येथून विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणून तिच्यावर नगर, पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी योगेश सिद्धेश्वर शिंदे (रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) असे नराधमाचे नाव असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपीने औरंगाबाद येथून पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून नगर येथे पळवून आणले. पीडिता विवाहित आहे. आरोपीने 2017 ते 20 जुलै 2019 या दोन वर्षांत पीडितेसोबत नगरसह पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी शरीर संबंध प्रस्तापित केले. विशेष म्हणजे आरोपीने पीडितेला नगर एमआयडीसीमध्ये भाड्याची खोली घेऊन दिली होती. या खोलीतही आरोपीने पीडितेवर अनेकही अत्याचार केला. एवढेच नाही तर रांजनगाव, कारेगाव, शिरुर येथील वेगवेगळ्या लॉजवर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी योगेश शिंदे यांचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO:फुटपाथवरून जात होती महिला, अचानक उघड्या गटारात पडली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 08:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...