'नकोशी'ला फेकलं रस्त्यावर, बदलापुरातील हृदयद्रावक घटना

'नकोशी'ला फेकलं रस्त्यावर, बदलापुरातील हृदयद्रावक घटना

रात्री उशिरा पिंपवळी गावातील रस्त्यावर एका बाळाचा रडण्याचा आवाज शेजारी असलेल्या घरातील एका तरुणाला ऐकू आला

  • Share this:

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

अंबरनाथ, 21 जानेवारी : आजही मुलगी झाली म्हणून ती कशी नकोशी असते याचे वास्तव समोर आलं आहे. बदलापुरातील ग्रामीण भागात एक दिवसाच्या नवजात स्त्री अर्भकाला रस्त्यावर टाकून दिल्याची हृदयद्रावक घटना सामोर आली आहे. दरम्यान, मुलगी झाली म्हणून निर्दयी  माता पित्याने हा प्रकार केल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे.

बदलापूर बारवी डॅम जवळ ही घटना रविवारी घडली. रात्री उशिरा पिंपवळी गावातील रस्त्यावर एका बाळाचा रडण्याचा आवाज शेजारी असलेल्या घरातील एका तरुणाला  ऐकू आला. त्यावेळी त्याने टॉर्चच्या मदतीने शोध घेतला असता रस्त्याच्या शेजारी झुडपात हे अर्भक टाकल्याचं त्याला निदर्शनास आलं होतं.

त्याने गावातील पोलीस पाटलांना याची माहिती देत पोलीस ठाण्याला देखील खबर दिली. कुळगांव पोलिसांनी घटनास्थळी जात या बाळाला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं.

रस्त्यावर फेकल्यानं या बाळाच्या गालाला खरचटलं आहे. दरम्यान, या प्रकरणी कुळगांव बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बाळ सुखरूप असून निर्दय मात्या पित्याचा पोलीस शोध घेत आहेत.


==============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 07:28 AM IST

ताज्या बातम्या