वडिलांना सांगूनही छेडछाड थांबली नाही, शालेय विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

वडिलांना सांगूनही छेडछाड थांबली नाही, शालेय विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

छेडछाडीबाबत तिने वडिलांना कल्पना दिली होती. पण...!

  • Share this:

बारामती, 31 जानेवारी : सध्या गुन्हेगारी शिगेला पोहचली आहे. त्यात एक धक्कादायक प्रकार बारामतीमधून समोर आलं आहे. रोजच्या होणाऱ्या  छेडछाडीला कंटाळून मुलीची आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार माळेगाव इथे घडला आहे.

शाळेत जाण्याऱ्या साक्षी उगाडे हिने गळफास  घेऊन आयुष्य संपवलं आहे. काही मुलांकडून साक्षीची रोज छेडछात होत होती. याबद्दल तिने तिच्या कुटुंबीयांना कल्पना दिली होती. पण तरीहीदेखील तिला रोज त्रास देण्यात येत होता.

रोजच्या या छेडछाडीला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलच आत्महत्या केली. छेडछाडीबाबत तिने वडीलांना कल्पना दिली होती. वडीलांनी याबाबत संबंधीत  मुलांच्या पालकांनाही समज दिली होती. पण तरीदेखील मुलं रोज साक्षीला त्रास देत होते.

या संपूर्ण प्रकरणात 2 मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सगळ्यात खळबळजनक म्हणजे छेडछाडीला  कंटाळून आत्महत्या करणारी

बारामती  तालुक्यातली ही तिसरी मुलगी आहे. त्यामुळे बारामतीत पोलिसांचा धाक संपला का? असा सवाल आता उपस्थित होतो.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात साक्षीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर बारामती पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

यात पोलीस साक्षीच्या कुटुंबीयांचीही चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर शालेय विद्यार्थीनीला अशा पद्धतीने गमावल्य़ाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तर साक्षीच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.


SPECIAL REPORT : 'पबजी' दिवसाला किती कमाई करतो माहिती आहे का?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 11:26 AM IST

ताज्या बातम्या