S M L

राजकारणात जास्त बोलणाऱ्यांचं काय होतं ते आपण पाहतोय-महाजनांचा खडसेंना टोला

धुळ्यात येऊन महाजन यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधणारे खडसे आणि गोटे यांच्यावर मार्मिक भाष्य करून आक्रमक नेत्यांना इशारा वजा समाज दिली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 26, 2017 08:45 AM IST

राजकारणात जास्त बोलणाऱ्यांचं काय होतं ते आपण पाहतोय-महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव,26 डिसेंबर:  भाजपच्या वाचाळ नेत्यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी सणसणीत टोला लगावला आहे.  सोमवारी धुळ्यात बोलताना, राजकारणात जास्त बोलणाऱ्यांचं काय होतं, ते सर्वांनाच माहीत आहे, असं महाजन म्हणाले.  त्यांचा रोख एकनाथ खडसे आणि अनिल गोटेंकडे होता, असंच दिसलं. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंचं महाजन कौतुक करत होते.. भामरे नम्र आहेत, आणि कमी बोलतात. त्यांच्या यशामागे हेही एक कारण आहे. नाहीतर जास्त बोलणाऱ्यांचं काय होतं, ते आपण पाहतोच, असं ते म्हणाले.  प्रेक्षकांनाही त्यांचं हे वाक्य आवडलं, आणि त्यावर हशा आणि टाळ्या पडल्या.

जास्त बोलणाऱ्याचे करणाऱ्यांचे राजकारणात काय होते, हे आपल्याला माहित आहे , कमी बोलणारे फायद्यात राहतात, असा चिमटा घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी एका तिरात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार अनिल गोटे यांच्यावर निशाणा साधला. धुळ्यात संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांचे उदाहरण देत महाजन यांनी नम्रतेने काम करताना निश्चित यश मिळते असे सांगितले.

यावेळी महाजन यांनी कोणाचेही नाव न घेता जास्त बोलणारी माणसाची अवस्था कशी होते याची आपल्याला कल्पना आहे. असे सांगताच समारंभात हशा पिकाला. महाजन यांचा रोख कोणाकडे आहे हे उपस्थितीने लागलीच हेरले. धुळ्यात येऊन महाजन यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधणारे खडसे आणि गोटे यांच्यावर मार्मिक भाष्य करून आक्रमक नेत्यांना इशारा वजा समाज दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 08:45 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close