गिरीश महाजन आता नाशिकसह जळगाव जिल्ह्याचेही पालकमंत्री

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या खांच्याकडे आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. गिरीश महाजन यांच्याकडे आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 06:13 PM IST

गिरीश महाजन आता नाशिकसह जळगाव जिल्ह्याचेही पालकमंत्री

राजेश भागवत (प्रतिनिधी)

जळगाव, 7 जून- राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या खांच्याकडे आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. गिरीश महाजन यांच्याकडे आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपदही कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालटाची अर्थात विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पुण्याच्या पालकमंत्र्यांचा कार्यभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. गिरीश बापट यांचे अन्न आणि नागरी पुरवठा खातं जयकुमार रावल यांना तर संसदीय कार्यमंत्रिपद विनोद तावडे यांना देण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याचे राज्याचे सहसचिव माधव गोडबोले यांनी राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाचे परिपत्रक काढले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. मात्र, जळगाव जिल्ह्यात नियोजन बैठक यासह विविध कार्यक्रमांना पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील गैरहजर राहत असल्याने याबाबत जळगावकरांमध्ये नाराजी होती. मात्र, आता त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याने आणि स्थानिक मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच आगामी निवडणुकांचे नियोजन डोळ्यासमोर ठेऊन उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या आठही जागा जिंकण्याचे नेतृत्त्व करणाऱ्या गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद देण्यात आल्याचीही चर्चा आहे. महाजन हे स्थानिक असल्याने जळगाव जिल्ह्यातील रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.


Loading...

VIDEO:आयारामांची आमच्याकडे लाईन, गिरीश महाजनांचा चव्हाणांवर पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2019 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...