Elec-widget

..तर अमळनेरमध्ये हाणामारीनंतर अजून वाईट झालं असतं- गिरीश महाजन

..तर अमळनेरमध्ये हाणामारीनंतर अजून वाईट झालं असतं- गिरीश महाजन

अमळनेरमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार राडा झाला. हा प्रकार अत्यंत वाईट होता. मी पुढे आलो नसतो तर अमळनेरमध्ये अजून वाईट झालं असतं, असं भाजपचे नेते गिरीश महाजन 'न्यून १८ लोकमत'च्या चर्चेत बोलताना सांगितले.

  • Share this:

मुंबई, १६ एप्रिल- अमळनेरमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार राडा झाला होता. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली. मात्र, हा प्रकार नेमका का घडला याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नव्हती. त्यावर भाजपचे 'इनकमिंग मास्टर' अर्थात भाजप नेते गिरीश महाजन यांनी 'न्यून १८ लोकमत'च्या चर्चेत खुलासा केला.

अमळनेरमधील हाणामारीचा अर्थ वेगळा होता. हा प्रकार अत्यंत वाईट आणि अनपेक्षीत होता. स्मिता वाघ यांना एकमताने तिकीट दिलं होतं. परंतु तिकीट वाटपाचं जजमेंट चुकल्याचे  गिरीश महाजन यांनी कबूल केले. मी, उदय वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील आम्ही तिन्ही एकाच गाडीतून आलो होतो. तेव्हा सर्व काही ठीक होते, परंतु बी. एस. पाटील यांचं विधान चुकीचे होते. त्याचं समर्थन करणार नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. मी पुढे आलो नसतो तर अमळनेरमध्ये अजून वाईट झालं असतं, असंही गिरीश महाजन यांनी सांगितले.


वाचा काय म्हणाले, भाजपचे 'इनकमिंग मास्टर' गिरीश महाजन..

- अमळनेरमध्ये घडलेला प्रकार चुकीचा

Loading...

- स्मिता वाघ यांना एकमताने तिकट दिलं होतं

- अनिल गोटेंचं वागणं, बोलणं चुकीचं

- उत्तर महाराष्ट्रात ८ जागा जिंकणार

- ८ जागा निवडून देण्याची जबाबदारी माझी

- मारामारीचा अर्थ वेगळा होता

- राज ठाकरे आम्हाला संकट वाटत नाही

- राज ठाकरेंकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहोतो.

- राज ठाकरे सुपारी घेतात... त्यापेक्षा एखादा उमेदवार निवडून दाखवा...

- नार पार वर राज ठाकरेंचा अभ्यास नाही. उघाच दिशाभूल करायचं काम चालू आहे.

- राज जे बोलतात ते खरं ठरलं तर मी राजीनामा देईन.

- आम्ही एक थेंब पाणी देणार नाही. यावर भाजप ठाम

- पाण्याचं presentation आम्ही पवार साहेबांना दाखवलं. त्यांनी आमचं कौतुक केलं.

- राज ठाकरेंचा आम्हाला काहीही तोटा नाही. ५६ पक्ष सोबत असेल तरी पंतप्रधान पदासाठी मोदीशिवाय कोणी नाही


गिरीश महाजन यांना जोरदार धक्काबुक्की...

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात गिरीश महाजन यांना जोरदार धक्काबुक्की करण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यातही जोरदार हाणामारी झाली. गिरीश महाजन हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्याच्यासोबत हा प्रकार घडला होता.  या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बीडमधील हाच तो VIDEO, ज्यामुळे पंकजा मुंडे सापडल्या वादात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...