S M L

विजयी रॅलीत गिरीश महाजन भारावले,जीपवरुन कार्यकर्त्यांमध्ये मारली उडी

जामनेर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने 25 पैकी 25 जागा जिंकल्यात. या विराट विजयानंतर भाजपने शहरात धुमधडाक्यात विजयी मिरवणूक काढली

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2018 07:26 PM IST

विजयी रॅलीत गिरीश महाजन भारावले,जीपवरुन कार्यकर्त्यांमध्ये मारली उडी

जळगाव, 11 एप्रिल : जामनेर नगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकावलाय. जलसंधारण मंत्री गिरीष महाजन विजयाने इतके भारावून गेले की त्यांनी विजयी रॅलीत कारवरून कार्यकर्त्यांच्या अंगावरच उडी मारली.

जामनेर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने 25 पैकी 25 जागा जिंकल्यात. या विराट विजयानंतर भाजपने शहरात धुमधडाक्यात विजयी मिरवणूक काढली. यावेळी मोकळ्या जीपमधून गिरीश महाजन रॅलीत सहभागी झाली. गिरीष महाजन जीपवर असताना कार्यकर्त्यांनी त्यांना उडी मारण्यास आग्रह केला. मग काय  गिरीष महाजन यांचा उत्साह एवढा टोकाचा होता की त्यांनी जीपवरुन कार्यकर्त्यांमध्ये उडी घेतली आणि कार्यकर्त्यांनीही त्यांना झेललं. गमंत म्हणजे, पहिल्यांदा उडी मारताना एका कार्यकर्त्याने त्यांना पकडलं पण महाजनांनी त्याला झुगारून लावलं आणि त्या

आता राज्याच्या एका मंत्र्याला असं करणं शोभतं का हा आता चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण त्यांचा एका चित्रपटातील नायकासारखा हा स्टंट सगळ्यांनाच आश्चर्यचकीत करणारा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 07:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close