'ते' लग्न दाऊदच्या नातेवाईकाचं होतं हे माहीत नव्हतं -महाजन

नाशिकमधील दाऊद इब्राहिमच्या नातलगाच्या लग्नाला हजेरी लावल्याप्रकरणी मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, असं स्पष्टीकरण नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 25, 2017 07:39 PM IST

'ते' लग्न दाऊदच्या नातेवाईकाचं होतं हे माहीत नव्हतं -महाजन

25 मे : नाशिकमधील दाऊद इब्राहिमच्या नातलगाच्या लग्नाला हजेरी लावल्याप्रकरणी मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, असं स्पष्टीकरण नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय.

शहर ए खतीब यांच्या घरातलं हे लग्न असल्याने आम्ही सगळे तिथं गेलो होतो, तसंच समोरचं कुटुंब हे दाऊदचे नातलग असल्याचं आम्हाला अजिबात माहीत नव्हतं, अशी सारवासारव पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केलीय.

या लग्नाला हजर राहिलेल्या पोलिसांची चौकशी पोलीस आयुक्तांनी लावलीय त्यामुळे गिरीष महाजनांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्रीही खरंच राजकारण्यांचीही चौकशी करणार का हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...