जळगाव, 2 फेब्रुवारी : राज्यात एकीकडे सेना-भाजपच्या युतीची चर्चा सुरू असतानाच जळगावात मात्र गिरीश महाजन विरूद्ध गुलाबराव पाटलांमध्ये जोरदार खडाखडी सुरू आहे. युती झाली नाही तर दोघेही नेते राजकीय आखाड्यात कुस्ती खेळण्यासाठी अगदी लंगोट बांधून तयार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हनुमान गिरीश महाजन यांची जळगावात कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनाही सज्ज झाली आहे. राज्यात युती झाली नाहीतर आपण महाजनांच्याविरोधात राजकीय कुस्ती खेळण्यासाठी लंगोट बांधून तयार असल्याचं सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.