'बापट साहेब परत या, कचऱ्याचा प्रश्न आता सुटला आहे'

'बापट साहेब परत या, कचऱ्याचा प्रश्न आता सुटला आहे'

आता कचरा कोंडीचा प्रश्न सुटल्यानंतर काँग्रेसने पोस्टरबाजी करून परदेश दौऱ्यावर गेलेल्या गिरीश बापट यांना परत येण्याचं आवाहन केलंय.

  • Share this:

10 मे : 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही. पुण्यात कचरा कोंडी फुटल्यानंतर आता परदेश दौऱ्यावर गेलेल्या नेत्यांना पुणेरी पद्धतीने कान उपटले जात आहे. 'बापट साहेब, परत या', आता कचऱ्याचा प्रश्न मिटला आहे अशी पोस्टरबाजी करण्यात आलीये.

फुरसुंगी गावात कचरा डेपो हटवण्यावरुन अलीकडेच पुण्यात मोठे आंदोलन झाले. त्यामुळे पुणे शहरात 20 दिवसांहून अधिक कचराकोंडी झाली होती. शहरात कचराकोंडीचा प्रश्न निर्माण झाला असतांना महापौरांसह पालकमंत्रीही परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे नेत्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका झाली होती.

आता कचरा कोंडीचा प्रश्न सुटल्यानंतर काँग्रेसने पोस्टरबाजी करून परदेश दौऱ्यावर गेलेल्या गिरीश बापट यांना परत येण्याचं आवाहन केलंय. बापट साहेब तुम्ही परत या,  तुम्हाला कुणीही रागवणार नाही, आम्ही तुमची आतुरतेनं वाट पाहत आहोत असं पोस्टर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी लावलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 04:48 PM IST

ताज्या बातम्या