S M L

2002च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी 16 वर्षानंतर आरोपीला अटक

2002मध्ये झालेल्या मुंबई घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपीला अखेर औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे.

Updated On: Aug 8, 2018 02:00 PM IST

2002च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी 16 वर्षानंतर आरोपीला अटक

औरंगाबाद, 08 ऑगस्ट : 2002मध्ये झालेल्या मुंबई घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपीला अखेर औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएस पथकाकडून ही अटक करण्यात आली आहे. घाटकोपर बॉम्बस्फोटात अब्दुल रहमान शेख हा आरोपी फरार होता. पोलीस त्याचा कसून तपास करत होती. अखरे त्याच्या मुसक्या आवळण्य़ात गुजरात एटीएस पथकाला यश आलं आहे.

आरोपी अब्दुल रहमान शेख हा कैसर कॉलनीत राहणार आहे. त्याचं वय 43 वर्ष आहे. तो 2002 पासून सौदीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. 5 तारखेला तो भारतात आला होता. त्याच्या पत्नीवर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू होते तिला भेटण्यासाठी तो भारतात आला होता. याची खबर गुजरात एटीएस पथकाला लागताच त्याला सापळा रचून पकडण्यात आलं.

CCTV : वृद्धाला धडक देऊन रुग्णालयात नेण्याचं नाटक, पुढे जाऊन रस्त्यावरच दिलं टाकूनघाटकोपर येथे २ डिसेंबर २००२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या बेस्ट बस डेपोतील बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये जवळपास 32 नागरिक, महिला, मुले जखमी झाली होती. या बॉम्बस्फोटामुळे बेस्टसह सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास ५ लाख ३३ हजार ६५० रुपयांचे नुकसान झालं होतं.

या गुह्यातील ९ जण अजूनही फरार असून त्याचा शोध घेतला जातो आहे. तब्बल १६ वर्षांपासून या गुह्याचा तपास सुरू असून इरफान कुरेशी (४७), रा. शहा कॉलनी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

Loading...
Loading...

हेही वाचा...

VIDEO : भावाच्या अंत्यसंस्काराला काही कमी पडू नये म्हणून बहिण झाली खंबीर

VIDEO : कावड घेऊन जाताना कारचा धक्का, रागात फोडली अख्खी गाडी

मोदी सरकारचा मोठा उपक्रम, १५० रुपये गुंतवून मिळवा २५ लाख रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 01:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close