31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 5 रुपयांत मिळवा दारू पिण्याचा परवाना!

सरत्या वर्षाला निरोप देवून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई मद्याचा आस्वाद घेते. मद्य घेण्यासाठी परवाण्याची आवश्यकता आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2018 02:21 PM IST

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 5 रुपयांत मिळवा दारू पिण्याचा परवाना!

मुंबई, 31 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई मद्याचा आस्वाद घेते. मद्य घेण्यासाठी परवाण्याची आवश्यकता आहे. हिच बाब लक्षात घेत उत्पादन शुल्क विभागाने 1 लाख परवाने खुल्या बाजारात विक्रीसाठी ठेवले आहेत. तुम्हाला यावर विश्वास नाही बसणार पण हे खरं आहे.

एका दिवसाच्या परवाण्यासाठी 5 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच मद्यपींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बिअरबार, परमिट रुम, ढाबे चालकांनी तयारी सुरू केली आहे. बिअरबारला पहाटे 5 वाजेपर्यंत तर वाईन शॉपला रात्री 1 वाजेपर्यंत विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

पण त्यासाठी मद्यमान करणार्‍या तरुणांना आता परवाने घ्यावे लागणार आहेत. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला येथील मद्यपिंसाठी 1 लाख परवाने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. परवाना न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मद्यपींवर करडी नजर ठेवण्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर येथील खास पथके तैनात करण्यात आली आहेत. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली असून मद्यपान करून वाहने चालवणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच चौकाचौकात डॉल्बी, स्पिकर लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 12 ते 12.30 वाजेपर्यंत फटाके उडविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी सगळीकडेच जय्यत तयारी सुरू झाली आहे. अवघ्या काही तासात 2018 वर्षाला निरोप दिला जाणार आहे. आणि सरत्या वर्षांला निरोप देवून नविन वर्षांचं स्वागत करण्यासाठी अनेकांनी आपापल्या सेलिब्रेशनचं नियोजन केलं आहे.

Loading...

सगळीकडेच सध्या जल्लोषाचा माहोल आहे. वर्षातल्या कडू-गोड आठवणी जपत 2018 ला निरोप दिला जाणार आहे. आणि पुन्हा डोळ्यात अनेक स्वप्न घेवून नविन संकल्प करुन 2019 या नविन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे.

तर शहरांमध्ये अनेक इमारतींना रोषणाई करण्यात आली आहे. प्रामुख्याने राज्यातील महाबळेश्वर, माथेरान या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटक अधिक पसंती देत असतात आणि त्याच अनुशंगाने इथे महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कुठलीही कसर ठेवण्यात आलेली नाही.

त्यामध्ये महाबळेश्वरच्या तापमानात मोठी घट झालीये त्यामुळे पर्यटकांच्या आनंदात अधिकच भर पडते. कोकण आणि गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. समुद्रावर धम्माल मस्ती करताना पर्यटक दिसत आहेत. तर नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातली प्रमुख मंदिरंही रात्रभर खुली राहणार आहेत.


Special Report : पब्जी सोडा, साधे 4 शब्द फोनवर बोलता आले तरी खूप झालं!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...