पिस्तूलनंतर गौरी लंकेश आणि दाभोलकर हत्येप्रकरणात समोर आला धक्कादायक खुलासा

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2018 11:34 AM IST

पिस्तूलनंतर गौरी लंकेश आणि दाभोलकर हत्येप्रकरणात समोर आला धक्कादायक खुलासा

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

मुंबई, 28 ऑगस्ट : गौरी लंकेश आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा कसून तपास करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र एटीएस, कर्नाटक एसआयटी आणि सीबीआय जोरदार कामाला लागली आहे. या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहेत. ते म्हणजे गौरी लंकेश आणि दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली गाडी ही एकच होती अशी माहिती आरोपी शरद कळसकर याने सीबीआयला दिली असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. रविवारी सीबीआयने असा दावा केला होता की गौरी लंकेश आणि दाभोलकर यांची हत्या एकाच पिस्तूलाने करण्यात आली होती आणि आता त्यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली गाडीदेखील एकच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नालासोपारा स्फोटक प्रकरणापासून ते औरंगबाद आणि नंतर जालनापर्यंत या प्रकरणाचे धागे-दोरे आता उघड होत आहे.

शरद कळसकरने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक एसआयटी गाडीची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झाली आहे.  या दोन्ही हत्यांमध्ये एकाच पल्सर मोटरसायकलचा वापर करण्यात आला असल्याची माहिती हाती लागली आहे. यासंबंधी कर्नाटक एसआयटी आणि महाराष्ट्र सीबीआय चर्चा करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. एटीएस, सीबीआय दोन्ही तपास यंत्रणांशी कर्नाटक एसआयटी चर्चा करणार आहे.

दरम्यान, नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांची पोलीस कोठडी आज संपते आहे. या तिघांनाही आज मुंबईतील सेशन्स कोर्टासमोर हजर केलं जाईल. गेल्या वेळी कोर्टाने १० दिवसांसाठी पोलीस कोठडी वाढवून दिली होती. शस्त्रसाठ्या संदर्भात एक पत्र सापडलं आहे. त्याबद्दल चौकशी करायची आहे. त्या पत्रातील सांकेतिक भाषेचा उलगडा करण्यासाठी आरोपींची चौकशी करण्याकरता त्यांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद पोलिसांनी केला होता. तो कोर्टाने मान्य करत या तिघांनाही पोलीस कोठडी दिली होती.

राऊत, कळसकर, गोंधळेकर यांच्या विरोधात युएपीए तसंच आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तिघांच्याही पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी १९ गोष्टींचा आधार घेण्यात आला होता. मात्र एटीएसनं कोणत्या आधारे ही केस दाखल केली आहे हे कळण्यास मार्ग नसल्याचा दावा बचाव पक्षानं केला होता. त्यामुळे आज नेमकं या प्रकरणात काय होईल हे पाहावं लागणार आहे.

Loading...

 

VIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2018 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...