S M L

देहुरोडला गावकऱ्यांचं गटारात बसून आंदोलन

गावातील गटारांची दुरुस्ती व्हावी या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 21, 2017 07:55 PM IST

देहुरोडला गावकऱ्यांचं गटारात बसून आंदोलन

पुणे, 21 ऑक्टोबर: मुंबई-पुणे हायवे रोडलगतच्या देहुरोड इथल्या ग्रामस्थांनी वाहत्या गटारात बसून आज आंदोलन केलंय. गावातील गटारांची दुरुस्ती व्हावी या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं.

गावता गटारांचा प्रश्न ही एक अत्यंत मोठी समस्या होऊन बसली आहे.  गावातील शंकर मंदिर चौकातल्या  गटारांची दुरुस्ती करावी अशी मागणी गेले दीड वर्ष हे ग्रामस्थ करत आहेत. या गटारांमुळे गावकऱ्यांना रोज येण्या जाण्यासही त्रास होतो.  विकास नगर, किवळे, रावेत, या गावांना तसंच मुंबई- पुणे हायवे पासून मुंबई बेंगलोर हायवेला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनचालकांची वर्दळ असते. या उघड्या गटारांमुळे अनेकवेळा अपघातही झाले आहेत. देहुरोड कँन्टोमेंट बोर्डाला निवेदन आधीच दिले गेले आहे. हे गटार कायमस्वरूपी दुरुस्त न केल्याने  ग्रामस्थ संतापले आहेत.म्हणूनच आज गावातील आंदोलकांनी गटारीच्या वाहत्या पाण्यात बसून आंदोलन करत कँन्टोमेंट बोर्डाचा निषेध नोंदवला आहे.

त्यामुळे आतातरी या गटारांची दुरुस्ती प्रशासन करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 07:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close