चंद्रपूरमधील गुलवाडे रुग्णालयात गॅसगळती, गरोदर महिलांना बाहेर काढण्यात यश

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2018 10:58 AM IST

चंद्रपूरमधील गुलवाडे रुग्णालयात गॅसगळती, गरोदर महिलांना बाहेर काढण्यात यश

20 एप्रिल : चंद्रपूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या प्रसिद्ध गुलवाडे रुग्णालयात काल रात्री अचानक गॅसगळती सुरू झाली. गॅसगळतीमुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता. पण सुदैवाने वेळेवर रूग्णांना बाहेर काढल्यामुळे मोठी जीवीतहानी टळली आहे.

जटपुरागेटजवळ असलेल्या गुलवाडेमध्ये गुरूवारी रात्री 11च्या सुमारास अचानक गॅस सिलेंडर लीक झाल्याचं कळताच रुग्णांच्यानातेवाईकांनी रूग्णांना हॉस्पीटल बाहेर काढलं. यावेळेस काही लहान मुलं, गरोदर स्त्रीया देखील दाखल होत्या. पण त्यांना सगळ्यांना सुखरूप बाहेर हलवण्यात आलं आहे.

दरम्यान रूग्णालयातील काही खोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्र बसवण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरमधून ही गॅस गळती झाल्याचा दावा डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 07:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...