News18 Lokmat

गौरी लंकेश हत्या प्रकरणाला नवं वळण, या माजी संपादकाचे नाव उघड

एसआयटीच्या पुरवणी दोषारोपपत्रमध्ये राणे यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 7, 2019 08:20 PM IST

गौरी लंकेश हत्या प्रकरणाला नवं वळण, या माजी संपादकाचे नाव उघड

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

बंगळुरू, 07 जानेवारी : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणात

'सनातन प्रभात'चे माजी संपादक शशिकांत राणे यांचं नाव समोर आलं आहे. एसआयटीच्या पुरवणी दोषारोपपत्रमध्ये राणे यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटक एसआयटीने या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केलं आहे. शशिकांत राणे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येसाठी पैसे पुरवल्याचा आरोप एसआयटीने केला आहे.

गौरी लंकेश प्रकरणात आरोपी अमित देगवेकर याच्या जबाबवरून राणे यांचे नाव उघड झालं आहे. काका नावाने राणे यांना ओळखलं जायचंस असं अमितने चौकशीत कबूल केलं आहे.

Loading...

दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी वीरेंद्र तावडे याने राणेंची भेट घडवली होती, अशी माहितीही देगवेकरने दिली.

मागील वर्षी एप्रिल 2018 मध्ये राणे यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

सनातनच्या माजी संपादकाचे नाव समोर आल्यामुळे दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेशया चारही हत्यांमध्ये पुन्हा एकदा संशयाची सुई सनातन संस्थेवर आली आहे.


==============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2019 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...