कोल्हापूर कारागृहात नेणाऱ्या मुरूमाच्या डंपरमधून गांजा जप्त

कोल्हापूर कारागृहात नेणाऱ्या मुरूमाच्या डंपरमधून गांजा जप्त

चक्क मुरूम नेणाऱ्या डंपर मधूनच गांजा आणि मोबाईल जेलमध्ये नेण्याचा प्रकार उघडकीस आलाय.

  • Share this:

07 आॅक्टोबर : कोल्हापूरच्या कारागृहात पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडलाय. चक्क मुरूम नेणाऱ्या डंपर मधूनच गांजा आणि मोबाईल जेलमध्ये नेण्याचा प्रकार उघडकीस आलाय.

जेल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे गांजा जेलच्या गेटवरच पकडला गेला. जेलच्या गोडाऊनमध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यासाठी मुरुम नेणारा ट्रक आला. त्याचं रीतसर चेकिंग करताना चालकाच्या सीटजवळ हा गांजा सापडला. याआधीही कोल्हापूर कारागृहामध्ये दारू पार्टी झाल्याची घटना घडली होती. आज गांजा आणि मोबाईल सापडल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून कारागृहाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2017 08:56 PM IST

ताज्या बातम्या