पाच भावांनीच केला शेतमजूर तरूणीवर सामूहिक बलात्कार

पीडीत महिला ही त्यांच्याच शेतात कामाला होती. पीडीत महिलेने तक्रार करू नये यासाठी त्याने तिच्यावर दबावही आणला. मात्र नंतर त्यांचं बिंग फुटल्याने पोलिसांनी त्याला आणि त्याच्या मित्रांना जेरबंद केलं.

News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2018 09:47 PM IST

पाच भावांनीच केला शेतमजूर तरूणीवर सामूहिक बलात्कार

रवी जैस्वाल,जालना, ता. 22 नोव्हेंबर : जालना जिल्ह्यात सामुहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडालीय. मुख्य आरोपी हा शेतमालक असून त्यानं आणि त्याच्या पाच भाऊ आणि दोन मित्रांनी मिळून माणुसकीला काळीमा फासणारं हे कृत्य केलंय. पीडीत महिला ही त्यांच्याच शेतात कामाला होती. पीडीत महिलेने तक्रार करू नये यासाठी त्याने तिच्यावर दबावही आणला. मात्र नंतर त्यांचं बिंग फुटल्याने पोलिसांनी त्याला आणि त्याच्या मित्रांना जेरबंद केलं.


मुख्य आरोपी हा बाबासाहेब सदाशिव सोमधाने असून इतर आरोपींमध्ये देवीदास सदाशिव सोमधाने, कृष्णा मच्छिंद्र सोमधाने, मच्छिंद्र नामदेव कबळे, परमेश्वर शंकर गंडाळ यांना पोलिसांनी अटक केलीय. तर अर्जुन मच्छिंद्र सोमधाने आणि मनोहर मच्छिंद्र सोमधाने हे फरार आहेत.


मुख्य आरोपी बाबासाहेब सदाशिव सोमधाने हा जालना तालुक्यातील अहंकार देऊळगामध्ये राहतो. त्याची बायको ही गावची सरपंच आहे. त्याच्याच शेतात पीडीत महिला काम करते. बाबासाहेबने त्याच्या चार भाऊ आणि दोन मित्रांना सोबत घेऊन त्याच्याच शेतात महिलेवर बलात्कार केला. नंतर तिच्यावर दबाव आणून पोलिसात तक्रार करून दुसऱ्याच माणसांची नावं सांगितली.

Loading...


पोलिसांनी चार जणांना अटकही केली होती. नंतर महिलेच्या जबाबामध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी वेगळ्या अँगलने तपास केला असता त्यांना खरी वस्तुस्थिती समजली. या आधी तक्रार करण्यासाठी ज्या लोकांनी पीडीत महिलेला मदत केली तेच आरोपी असल्याचं पोलिसांना आढळून आलं.


पोलिसांनी तातडीनं कारवाई करत त्या पाच जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. त्या आरोपींनाही तातडीने अटक केली जाईल असं विभागीय पोलीस उपाधिकारी शिलवंत ढवळे यांनी सांगितलंय. घटनेबद्दल जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केलीय.

VIDEO : नाशिकचे खरे शत्रू कोण? तुकाराम मुंढेंचे बेधडक खुलासे!


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 09:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...