S M L

'नमामि गंगे' राष्ट्रीय अभियानातून जलतज्ज्ञ चितळे बाहेर पडले !

जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी मोदींचं 'ड्रिम प्रोजक्ट' असलेल्या 'नमामि गंगे' राष्ट्रीय मिशनचा राजीनामा दिला आहे. गंगा प्रदूषण थांबविण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न तोकडे पडत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Chandrakant Funde | Updated On: Aug 11, 2017 12:47 PM IST

'नमामि गंगे' राष्ट्रीय अभियानातून जलतज्ज्ञ चितळे बाहेर पडले !

मुंबई, (वृत्तसंस्था) 11ऑगस्ट : जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी मोदींचं 'ड्रिम प्रोजक्ट' असलेल्या 'नमामि गंगे' राष्ट्रीय मिशनचा राजीनामा दिला आहे. गंगा प्रदूषण थांबविण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न तोकडे पडत असल्याचं त्यांनी म्हटलंय. अलाहाबाद, कानपूर, वाराणसीसह गंगा किनाऱ्यावरील नगरपालिका आणि महापालिका या नदी स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष करीत आहेत. ४० हून अधिक कारखान्यातून गंगेच्या पाण्यात घाण सोडली जाते. त्यामुळे प्रदूषण काही थांबत नाही. केवळ लोकजागृती करुन हा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. चितळे यांच्या राजीनाम्यामुळे नमामि गंगे या राष्ट्रीय नदी स्वच्छता अभियानाला मोठा फटका बसलाय.

गुजरातमध्ये नर्मदा स्वच्छ करण्याच्या कामामध्ये जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते मुख्यमंत्री असताना मदत केली होती. त्या कामात कमालीचे यश मिळविल्यानंतर नमामि गंगे या प्रकल्पामध्ये माधवराव चितळे यांची खास नेमणूक करण्यात आली होती. भारतीय मानसिकतेमध्ये नदीचे कितीही मंत्र आणि श्लोक असले तरी आपली कृती योग्य नाही. अशीच स्थिती गंगेची आहे. प्रदूषण रोखणारी यंत्रणा उभी करण्यासाठी उत्तरप्रदेशातील नगरपालिका आणि महापालिका लक्ष देत नाहीत. येथे काहीही केले तरी काम उभे राहील, असे वाटत नाही. त्यामुळे सदस्यत्वाचा राजीनामा नुकताच दिल्याचे चितळे यांनी सांगितले.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांच्यापाठोपाठ माधव चितळे यांनीही मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधून अंग काढून घेतल्याने केंद्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. नीती आयोग हे देखील मोदीचीच कल्पना होती. पण तिथंही पनगारिया सारख्या अर्थतज्ज्ञांनी राजीनामा दिल्याने केंद्र सरकारच्या भविष्यातल्या आर्थिक धेय धोरणांनाच खीळ बसलीय त्यांनंतर आता राष्ट्रीय गंगा नदी स्वच्छता अभियानाचीही तीच गत होणार असं दिसतंय, तिथंही माधवराव चितळेंसारख्या जलतज्ज्ञाने राजीनामा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 12:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close