'त्या' घटनेला वेगळं वळण.. मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या तरुणीवर गॅंगरेप

7 जुलैला ती मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. पार्टीत चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. परंतु घाबरलेल्या पीडितेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 01:27 PM IST

'त्या' घटनेला वेगळं वळण.. मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या तरुणीवर गॅंगरेप

औरंगाबाद, 1 ऑगस्ट- मराठवाड्यातील दुष्काळमुळे पोट भरण्यासाठी मुंबईला गेलेल्या एका तरुणीला आपलं सर्वस्व गमवावं लागल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होता. या घटनेला आता वेगळं वळण लागलं आहे. पीडित तरुणी मैत्रिणीच्या बर्थ डे पार्टीला गेली होती. तिथे चार नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. अमानुष अत्याचारामुळे पीडितेचे मानसिक संतुलन बिघडले असून तिच्यावर औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

काय आहे हे प्रकरण?

19 वर्षीय पीडिता जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी आहे. दुष्काळमुळे गावाकडे रोजगार नसल्याने मुंबईला केटरींगचे काम करण्यासाठी गेली होती. चेंबूरला ती भावाकडे राहून काम करीत होती. 7 जुलैला ती मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. पार्टीत चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. परंतु घाबरलेल्या पीडितेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. रात्री ती परत आली आणि त्यानंतर ती घराबाहेर पडलीच नाही. तिला चालता फिरता येत नव्हते. म्हणून तिला वडिलांनी गावाकडे आणले. आजारी पडल्याने तिला नातेवाईकांनी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले.

(हेही वाचा...पुण्यात डॉक्टर महिलेला केले ब्लॅकमेल.. लॉजवर बलात्कार करून बनवला अश्लील व्हिडीओ)

गुप्तांगाच्या आत जखमा...

Loading...

औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात डॅाक्टरांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट केले. नराधमांनी पीडितेवर अमानुष अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या गुप्तांगाच्या आत जखमा झाल्या आहेत. अखेर वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता चेंबूरमध्ये चार जणांनी अत्याचार केल्याचे तिने सांगितले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही घटना मुंबईच्या चेंबूर परिसरातील असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस स्टेशनकडे वर्ग केला आहे. दरम्यान, पीडितेची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. ती कुणाशीही बोलत नाही. तिला चालता येत नाही. ती मधूनच ओरडून उठते. तिला मोठा मानसिक धक्का बसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मुंबई लोकलमध्ये 'पोलडान्स' करत तरुणाची स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2019 01:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...