19 वर्षाच्या मुलीवरील सामुहिक बलात्काराने हादरलं नागपूर

दोघांनी पीडितेवर अमानुष अत्याचार केले आणि दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2018 11:47 AM IST

19 वर्षाच्या मुलीवरील सामुहिक बलात्काराने हादरलं नागपूर

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 4 नोव्हेंबर : नागपूरच्या जबलपूर रोडवर 19 वर्षाच्या विद्यार्थिनीवर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अनिल थेटे आणि बाबा भगत असं या नराधमांचं नाव असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आउटर रिंग रोड परिसरात एकांतात बसलेल्या प्रेमी युगुलाला मारहाण करून दोन जणांनी तरुणीवर बलात्कार केला. आरोपींवर याआधीच प्रेमी युगुलांना त्रास देण्याचे आणि त्यातील तरुणींवर अत्याचार करण्याचे अनेक गुन्हे आहेत.

पीडित विद्यार्थिनी ही अजनी परिसरात राहणारी असून ती आपल्या प्रियकरासोबत बाईकने आऊटर रिंग रोड परिसरात आली होती. तेव्हा या ठिकाणी आरोपी अनिल थेटे आणि बाबा भगत आले आणि त्यांनी या मुलाला मारहाण केली. त्यानंतर या दोघांनी पीडितेवर अमानुष अत्याचार केले आणि दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.

पीडितेने पळत जाऊन जवळचा धाबा गाठला. घडलेला सर्व प्रकार धाबाचालकाला सांगितला. त्यानंतर धाबाचालकाने लगेच पोलिसांना बोलावले. पीडित विद्यार्थिनी आणि तिचा मित्र यांना पोलिसांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केली. त्यानंतर अनिल थेटे आणि बाबा भगत या दोन आरोपींना क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत.

Loading...

दरम्यान, गेल्या काही वर्षात याच ठिकाणी प्रेमी युगुलांवर हल्ले करून तरुणींवर अत्याचार करण्याच्या प्रकरणात अफरोज गँगवर पोलिसांनी कारवाई केली होती. तसंच न्यायालयाने या आरोपींना २० वर्षांची शिक्षा ठोठावली होती.

आऊटर रिंग रोड परिसरात बसलेल्या अनेक जोडप्यांवर हे आरोपी अत्याचार करत होते पण बदनामीच्या भीतीपोटी कुणी तक्रार करत नव्हतं.


 

VIDEO #TRPमीटर : 'शनया'ची जादू फिकी झाली का?


 

<iframe class="video-iframe-bg-color" onload="resizeIframe(this)" id="story-314084" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzE0MDg0/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 11:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...