News18 Lokmat

'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' विरूद्ध 'गँग ऑफ वासेपूर', विधिमंडळात रंगणार सामना!

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष म्हणजे 'गँग ऑफ वासेपूर' आहे टोला लगावला.

News18 Lokmat | Updated On: Nov 18, 2018 08:06 PM IST

'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' विरूद्ध 'गँग ऑफ वासेपूर', विधिमंडळात रंगणार सामना!

मुंबई, ता. 18 नोव्हेंबर : नुकताच प्रदर्शित झालेला ठग्ज ऑफ हिंदोस्तान चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. मात्र सोमवारपासून महाराष्ट्राच्या जनतेला हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पुढचे काही दिवस 'ठग्ज ऑफ महाराष्ट्रा'चा नवा अंक पाहायला मिळणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरून 'ठग्ज ऑफ महाराष्ट्रा'चे पोस्टर तयार केलेत.


राधाकृष्ण विखे पाटील सरकारवर टीका करताना म्हणाले, मुख्यमंत्री फक्त आश्वासने देतात. त्यांचं एकही आश्वासन पूर्ण होतं नाही. सरकारनं कर्जमाफी जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने ती पोहोचली नाही. सरकारनं दुष्काळ जाहीर करायला विलंब केला.


शेतकरी सरण रचून आत्महत्या करताहेत ही वेळ या सरकारनं आणली. त्यांनी जनतेला ठगवलं, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना विरोधीपक्ष म्हणजे 'गँग ऑफ वासेपूर' आहे अशी टीका केली. ठग म्हणण्याचा पोरकटपणा विरोधकांनी करू नये त्यांनी जबाबदारीने वागावे असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

Loading...


धनंजय मुंडे यांनीही टीका करताना अधिवेशन वादळी होण्याचे संकेत दिले. राज्यात दुष्काळ जाहीर होऊन 21 दिवस झाले पण दुष्काळाच्या कोणत्याही उपाययोजनेचा जीआर निघाला नाही. राम मंदिरासाठी अयोध्येला जाण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा दौरा करायला हवा होता असा टोलाही त्यांनी लगावला.


तर धनगर समाजाचा अहवाल फुटत नाही , मराठा समाजाच्या अहवाल फुटतो म्हणजेच काही तरी काळबेरं आहे का? असा सवाल करत या अहवाल फुटीच्या विरोधात हक्कभंग मांडणार असण्याची घोषणा विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी केली.

VIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2018 08:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...