कोल्हापूरातील 'या' गावात गणेशाच्या पोस्टर पूजनानेच होतो गणेशोत्सव साजरा

युवा फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2017 12:55 PM IST

कोल्हापूरातील 'या' गावात गणेशाच्या पोस्टर पूजनानेच होतो गणेशोत्सव साजरा

कोल्हापूर, 31ऑगस्ट: भुदरगड तालुक्यातील नवरसवाडी इथं सामाजिक बांधिलकी जोपासत गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीच्या मूर्तीऐवजी पोस्टरची पूजा करून इथे गणेशोत्सव साजरा केला जातो. युवा फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो.

या गावात गणपतीची मूर्ती स्थापनच केली जात नाही. फक्त गणपतीच्या पोस्टरचीच पूजा केली जाते. तसंच गणेशोत्सवात होणारा बाकीचा अनाठायी खर्चही टाळला जातोय. त्याच खर्चाच्या रकमेतून अनेक समाजोपयोगी कामं केली जातात. गणेशोत्सवात या गावात डॉल्बीलाही फाटा दिला जातो.

या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या पैशातून अनाथ मुलांना जेवण, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर असे अनेक सामाजिक उपक्रम या मंडळानं पार पाडलेत.

अशीच विधायक काम अनेक मंडळानी केली तर असे उत्सव समोजोत्सव व्हायला उशिर लागणार नाही आणि गणेशोत्सवाचा मुळ हेतू साध्य होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 12:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...