S M L

विसर्जनाला साताऱ्यात कोणाचा कायदा चालणार? उदयराजे की नांगरे पाटील?

'जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी...' असं म्हणत डाॅल्बी वाजणारच असा इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता.

Updated On: Sep 22, 2018 01:41 PM IST

विसर्जनाला साताऱ्यात कोणाचा कायदा चालणार? उदयराजे की नांगरे पाटील?

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

सातारा, 22 डिसेंबर: डीजेबाबत साताऱ्यात उदयनराजे आग्रही असताना पोलीस नेमकी काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र या विषयावरून उचकावू नका असं सांगत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कारवाईबाबत नेमकेपणा स्पष्ट केलाच नाहीये. त्यामुळे साताऱ्यात नेमका कायदा कोणाचा चालणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

उद्याच्या परिक्षेत्रात विसर्जन मिरवणुकीसाठी साताऱ्यात कडक बंदोबस्त तैनात केला असून डीजे लावणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान साताऱ्यातील भाषणात गणपती स्रोतात जे आहे तेच म्हटलं असल्याचं स्पष्ट करत आपण चुकीचे काहीच बोललो नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

'जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी...' असं म्हणत डाॅल्बी वाजणारच असा इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ध्वनी प्रदुषण करणाऱ्या डॉल्बीवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय.

लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात संघर्ष करण्याची आमची भूमिका नाही. कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कार्य करतो अशा शब्दात नांगरे पाटलांनी स्पष्ट केलंय.

Loading...
Loading...

गणपती मिरवणुकीत रात्रीच्या वेळीही डॉल्बी वाजवण्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी न्यायालय आणि पोलीस प्रशासनाला खुलं आव्हान देत डीजे लावणारच असल्याचा सज्जड दम भरलाय. आता पोलीस प्रशासनही डीजेवर कारवाई करण्याबाबत ठाम असल्याचे संकेत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेत. त्यामुळे उद्या साताऱ्या कोणाचं राज चालणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण दरम्यान, यातून बाप्पाच्या विसर्जनात कोणता अडथळा नको म्हणजे मिळवलं.

मी स्वतः गणेशभक्त आहे. त्यामुळे कोणत्याही गणेश भक्तावर कारवाई करण्याची आमची इच्छा नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांचं प्रबोधन करणार का? असा प्रश्न न्यूज१८ लोकमतच्या प्रतिनिधीने विचारल्यानंतर मात्र, आमच्यात उगाच फटाके पेटवू नका असं म्हणत विश्वास नांगरे पाटलांनी उदयनराजे यांच्याबद्दल बोलणं टाळलं.

त्यामुळे उदयनराजेंनी पोलीस प्रशासन आणि न्यायलयाला दिलेल्या आव्हानाबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.

काय म्हणाले होते उदयनराजे ?

२३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होतं आणि काय नाही होतं आणि कसं नाही होत. डॉल्बी लागलीच पाहिजेत, डेसीमल ठरवणारे कोर्ट आणि पोलीस डिपार्टमेंट कोण? डेसीमल ठरवतात तुमच्या आमच्यासारखे अवली लोक.

खऱ्या अर्थाने आम्ही गणपतीचे भक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचं काही कारणच नाही. त्रास तरीही झालाच तर एक दोन दिवस सहन करायला काही जात नाही.

मोठ्या आवाजाने बिल्डिंग पडतात.. हे पडतं... ते पडतं... या साऱ्या गोष्टी खोट्या आहेत. उलट जुन्या इमारती पाडण्यासाठी याचा वापर करा. जुन्या इमारतींची डागडुजी करत नाहीत. मात्र तुम्ही बिचाऱ्या "सुसंस्कृत पोरांचे" हट्ट ऐकत नाहीत. मग काय करायचं हे पाहिलं जाईल.

ही धमकी नाही तर ही मी समज देतोय, प्लॅन करा नाहीतर तुम्ही कोणत्याही कोर्टात जा,  डॉल्बी तर असणारच आहे. जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी... जब तक डॉल्बी रहेगी तब तक गणपती रहेगा. एवढंच सांगतो आता बोलायची वेळ नाही.

VIDEO: 'पवारांनी फसवाफसवी केली तर आम्ही बघून घेऊ', उदयनराजेंची थेट धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 22, 2018 01:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close