'या' गावात मशिदीत होतो गणेशोत्सव साजरा

विशेष म्हणजे या गावात हिदुंचे सण मुस्लीम साजरे करतात तर मुस्लिमांच्या सणात हिंदू नागरिक आनंदाने सहभागी होतात. यंदाचं 38 व वर्ष असून, बकरी ईद दोन दिवसांनी साजरी करण्यात येणार आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 28, 2017 12:58 PM IST

'या' गावात मशिदीत होतो गणेशोत्सव साजरा

सांगली, 28 ऑगस्ट: सांगली जिल्ह्यातील  हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या गोटाखिंडीतील गणेशोत्सव गेल्या 37 वर्षांपासून सुरू आहे. यंदा हे या गणेशोत्सवाचं   38 वं वर्ष आहे .  गावात दोन्ही समुदायाचे लोक मशिदीत गणेशोत्सव गुण्या गोविंदाने साजरा करतात. विशेष म्हणजे हिदुंचे सण मुस्लीम साजरे करतात तर मुस्लिमांच्या सणात हिंदू नागरिक आनंदाने सहभागी होतात. यंदाचं 38 व वर्ष असून, बकरी ईद दोन दिवसांनी साजरी करण्यात येणार आहे.

१९८० साली गोटखिंडी  गावात खूप पाऊस पडला होता. त्यावेळी गणेश मूर्ती वर पाणी पडत होते. तेव्हा गोटखिंडीत हिंदू - मुस्लीम नागरिकांना गणेश मूर्ती कोठे ठेवायची असा प्रश्न पडला होता. तेव्हा मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन आपल्या मशिदीत गणपती स्थापन करू असा निर्णय घेतला. तेव्हापासून आज पर्येंत गेले ३७ वर्षं मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा जोपासली जाते आहे. अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. तर यावर्षी जबाबदारी ही युवक वर्गातील उचलली असून या पुढे अशीच परंपरा चालू ठेवणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

साऱ्या देशाने आदर्श घ्यावा असं कार्य गोटखिंडीमध्ये सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close