News18 Lokmat

डबेवाल्यांनी पुणे- मुंबईला गणेशोत्सवाची दिली ही अनमोल गोष्ट

मुंबईत एखादी खोली वा हॉल दोन आठवडय़ांसाठी भाडय़ाने घेतला जातो

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2018 07:58 AM IST

डबेवाल्यांनी पुणे- मुंबईला गणेशोत्सवाची दिली ही अनमोल गोष्ट

मुंबई, १३ सप्टेंबर- मुंबईतल्या पुणेरी ढोलपथकाची परंपरा मावळमधल्या पथकांनी जपलीय. ही ढोल पथकं पुण्या- मुंबईत दहा दिवस मुक्काम ठोकून असतात. मुंबईत एखादी खोली किंवा हॉल भाड्यानं घेऊन तिथं ही वाद्य ठेवली जातात. राजगड ते शिवनेरी दरम्यान पसरलेल्या या पथकांनी ढोल पथकाची परंपरा जपण्याचं काम केलंय. मुंबईत तासभर ढोल वाजवणाऱ्या या पथकांना १० ते १५ हजार रूपये मिळतात. डबेवाले जरी मुंबईत काम करत असले तरी आपली परंपरा, खेळ यांची संस्कृती त्यांनी जपली आहे. मुंबईत पुणेरी ढोल पथक ही संकल्पना खऱ्या अर्थाने सर्व प्रथम डबेवाल्यांनीच आणली.

गावाकडे करमणूकीचे साधन म्हणजे ढोल पथक असायचे अनेक जण या ढोल पथकात असायचे. पण जसं जसं गणपती उत्सवाचे स्वरूप पालटत गेले तसं तसं या ढोल पथकांना मागणी वाढत गेली. आज मुंबईत गणपती पुढे एक तास वाजवायचे म्हटले की १० ते १५ हजार रुपये मिळतात. राजगड ते शिवनेरीदरम्यान पसरलेल्या या मावळात या पथकांनी मावळची परंपरा जपण्याचे काम केले आहे.या परंपरेस पुणेरी ढोल पथकं असेही म्हणतात. अशी शेकडोंनी पथकं मावळ प्रांतात आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांनी ही पारंपरिक कला जपली आहे.

या ढोल पथकांना मुंबई आणि पुण्यातून मोठी मागणी असते. मावळची ही वादक मंडळी पुण्या मुंबईत दहा दिवस मुक्काम ठोकुन असतात. मुंबईत एखादी खोली वा हॉल दोन आठवडय़ांसाठी भाडय़ाने घेतला जातो. तिथे सगळी वाद्यं ठेवली जातात. खाद्य सामान गावाकडून आणले जाते. गहू, तांदूळ, डाळ, तिखट मसाला सोबत ठेवला जातो. भाडय़ाने घेतलेल्या खोलीत सामुहिकरीत्या स्वयंपाक केला जातो. आजघडीला डबेवाले आणि त्यांच्या गावातील २५ ते ३० ढोल पथकं मुंबईत आहेत.

गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट : प्रबोधनाचा संपन्न वारसा जपणारा ‘केसरीवाड्याचा गणपती’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2018 07:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...