S M L

गणेशोत्सवानिमित्त या मार्गावर असेल जड वाहनांना बंदी

१६ टनपेक्षा अधिक वजनाचं सामान महामार्गावरून वाहून नेण्यास बंदी

Updated On: Sep 8, 2018 12:06 PM IST

गणेशोत्सवानिमित्त या मार्गावर असेल जड वाहनांना बंदी

मुंबई,०८ सप्टेंबर- गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा हायवेवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पनवेल ते सावंतवाडी, तसेच पेण मार्गे पनवेल ते सिंधुदुर्ग, वडखळ, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी अशा मार्गांवरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. १६ टनपेक्षा अधिक वजनाचं सामान महामार्गावरून वाहून नेण्यास बंदी असणार आहे. यात वाळू, रेती गौणखनिजांचा समावेश आहे.

८ आणि ९ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत बंदी असणार आहे.

१० सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापासून १३ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत बंदी असेल.

१७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून ते २० सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत बंदी असणार आहे.

२३ सप्टेंबरला सकाळी ८ ते २४ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत बंदी

Loading...
Loading...

१६ टनपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या सर्व अवजड वाहनांना ११ सप्टेंबर रात्री १२ वाजल्यापासून ते २४ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई- गोवा महामार्ग पुर्णत: बंदी राहील.

VIDEO : राम कदमांवर मुख्यमंत्री गप्प का?, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2018 12:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close