सेनेचे खासदार खैरेंची आर्थिक मदत सोनवणे कुटुंबियांनी नाकारली!

चंद्रकांत खैरे यांनी देऊ केलेली आर्थिक मदत सोनवणे कुटुंबियांनी नाकारली असून जगन्नाथने मराठा आरक्षणासाठी जीव अर्पण केला मात्र प्रशासन ही बाब नाकारत असल्याचा आरोप केला सोनवणे कुटुंबियांनी केला.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2018 07:36 PM IST

सेनेचे खासदार खैरेंची आर्थिक मदत सोनवणे कुटुंबियांनी नाकारली!

औरंगाबाद, ता. 26 जुलै : मराठा आंदोलनादरम्यान २५ जुलै रोजी कन्नड तालुक्यात विषारी औषध प्रशन केल्याने जगन्नाथ सोनवणे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान चंद्रकांत खैरे यांनी देऊ केलेली आर्थिक मदत सोनवणे कुटुंबियांनी नाकारली आणि जगन्नाथने मराठा आरक्षणासाठी जीव अर्पण केला, मात्र प्रशासन ही बाब नाकारत असल्याचा आरोप केला.

VIDEO : व्हायरल झालेल्या 'त्या' पोलिसाच्या फोटोची दुसरी बाजू !

कन्नड येथील देवगाव रंगारी येथील रहिवासी जगन्नाथ सोनवणे यांनी विषारी औषध प्रशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. जगन्नाथ त्यांच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जगन्नाथ यांनी मराठा आरक्षणासाठी जीव अर्पण केला मात्र प्रशासन ही बाब नाकारत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली तेव्हा त्यांनी आपल्या भावना त्याच्याकडे व्यक्त केल्या. यावेळेस खैरे यांनी देऊ केलेली आर्थिक मदतही जगन्नाथ यांच्या कुटुंबियांनी नाकारली. न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी खैरेंकडे केली आहे.

हेही वाचा...

'भारतीय माध्यमांनी 'व्हिलन' बनवलं', इम्रान खानच्या पहिल्याच पत्रकार परिषदेतल्या 10 महत्वाच्या गोष्टी

Loading...

मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा

गौरी लंकेश हत्या प्रकरण : 'हिट लिस्ट'वर पहिलं नाव गिरीश कर्नाडांचं

माझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडे

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 07:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...