आदिवासी महिलांची थरारक कारवाई, जप्त केल्या 7 हजार दारुच्या बाटल्या

गडचिरोलीत महिलांचा दारुविरुद्ध प्रचंड राग आहे. त्याविरुद्ध त्यांनी 'मुक्तिपथ' या गटाचाही स्थापना केली आहे.

महेश तिवारी महेश तिवारी | News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 07:47 PM IST

आदिवासी महिलांची थरारक कारवाई, जप्त केल्या 7 हजार दारुच्या बाटल्या

गडचिरोली 12 जुलै : गडचिरोलीतल्या आदिवासी महिलांनी आक्रमक भूमिका घेत आज धाडसी कारवाई करत सगळ्यांनाच चकित केलं. दारुबंदीसाठी आग्रही असणाऱ्या या महिलांनी चोरून आणलेली तब्बल 35 पेक्षा जास्त पोती देशी दारु शोधून पोलिसांच्या स्वाधीन केली. गुत्तेदारांनी छत्तीसगढमधून ही दारु चोरुन आणली होती. दारुबंदीविरुद्ध सक्रिय असणाऱ्या 'मुक्तिपथ' या गटांच्या महिलांनी ही कारवाई केली. महिलांनी दाखवेल्या या धाडसाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय.

गडचिरोलीत महिलांचा दारुविरुद्ध प्रचंड राग आहे. त्याविरुद्ध त्यांनी 'मुक्तिपथ' या गटाचाही स्थापना केली होती. गुत्तेदारांनी चोरून दारुचासाठा आणला अशी माहिती या गटाला मिळाली होती. हा दारुचा साठा जमिनीत पुरून ठेवण्यात आला होता. आदिवासी महिलांच्या एका गटाने जंगलात या दारुचा शोध घेतला.

विरारमध्ये बिअरशॉपवर आलेल्या 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

देशी दारुची 35 पोती जमिनीत पुरून ठेवलेली त्यांना आढळून आलं. त्यांनी ती सर्व पोती बाहेर काढली आणि ट्रकमध्ये भरून पोलिसांच्या हवाली केली. या 35 पोत्यांमध्ये तब्बल 7 हजार बाटल्या होत्या. पोलीस आता गुत्तेदारांचा शोध घेत आहेत. महिलांच्या या कारवाईमुळे अवैध दारुची विक्री करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालीय.

वाशिममध्ये महिलांची पोलीस स्टेशनवर धडक

Loading...

दारुबंदीसाठी महिलांनी वाशीम जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं केलंय. जिल्ह्याच्या उमरा शमशोद्दीन गांवात दारूबंदी करण्यासाठी गावातील महिलांनी अनसिंग पोलीस स्टेशनवर जोरदार धडक दिली. या गावात तातडीने दारूबंदी करावी अशी मागणी या महिलांनी केलीय. गेल्या अनेक वर्षांपासून दारुबंदी करावी अशी मागणी महिला करत होत्या. मात्र काहीही कारवाई होत नसल्याने अखेर महिलांनी पोलीस स्टेशनवरच धडक दिल्याने पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागली.

जगातल्या या सुंदर शहराची झाली 'तुंबई'; पाण्यात बुडतंय हे कालव्यांचं शहर

उमरा गांवात फार मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते. या दारूमुळे गांवातील तरुण  व्यसनाधीन बनले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. गावातील देशी आणि विदेशी दारुची मोठी विक्री होते. माणसं आपल्या कमाईतला मोठा हिस्सा दारुत खर्च करतात त्यामुळे घरात काम करणाऱ्या बायांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Liquor ban
First Published: Jul 12, 2019 07:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...