News18 Lokmat

गडचिरोली : मिरचीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

शेतकऱ्यांच्या मिरचीला तब्बल चारशे किलोमीटर दूर नागपुरला विकल्यानंतर भावच मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2017 03:04 PM IST

गडचिरोली : मिरचीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

29 एप्रिल : राज्यात शेतकऱ्यांच्या तुरीचा प्रश्न ऐरणीवर असताना आता गडचिरोलीतला मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय.  सिरोंचात शेतकऱ्यांनी भाव पडल्यानं मिरचीचा खुडाच केलेला नाही. तूर खरेदीचा मुद्दा गाजत असतांना आता मिरची उत्पादक शेतकऱ्याची व्यथा समोर आली आहे.

सिरोंचा तालुक्यात मोठया प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते माञ या मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या मिरचीला तब्बल चारशे किलोमीटर दूर नागपुरला विकल्यानंतर भावच मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. मिरची उत्पादनानंतर फायदा तर सोडा लागवड आणि तोडणीचा खर्च निघत नसल्याने शेतीतली मिरची अनेकांनी तशीच सोडुन दिलीय.

मिरची उत्पादनानंतर फायदा तर सोडा लागवड आणि तोडणीचा खर्च निघत नसल्याने शेतीतली मिरची अनेकांनी तशीच सोडून दिलीये. त्यामुळे आता पुढे करायचं काय असा सवाल उभा राहिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2017 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...