गडचिरोली: भामरागडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, 2 महिला ठार

गडचिरोली: भामरागडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, 2 महिला ठार

भामरागड तालुक्यातील कुंडूरवाहीच्या जंगलात पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला.

  • Share this:

गडचिरोली, 27 एप्रिल: भामरागड तालुक्यातील कुंडूरवाहीच्या जंगलात पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. नक्षलवाद्यांनी पोलीस अभियानावर भुसुरुंगस्फोट घडवून हल्ला केला. या स्फोटानंतर पोलीस आणि नक्षलवाद्यांच्यात जोरदार चकमक सुरु आहे.

या चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार झाले आहेत. रामको नरोटी आणि शिल्पा ध्रुवा असे या दोन महिला नक्षलवाद्यांचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाआधी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा रामको नरोटी ही सुत्रधार होती. तिच्यावर 12 खुनासह 45 गुन्हे दाखल आहेत. रामकोवर 12 लाखांचे बक्षिस होते.ती नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीची सदस्य देखील होती.

कुंडूरडवाहीच्या धनदाड जंगलात ही चकमक सुरु असून नक्षलवाद्यांचा हल्ला परतवून लावण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. दरम्यान चकमकीच्या ठिकाणी पोलिस पथकाशी अद्याप संपर्क झालेला नाही. वरिष्ठ पातळीवर यासाठी प्रयत्न सुरु आहेत.


...म्हणून भर रस्त्यात महिलेनं तरुणाला चपलेनं बडवलं, पाहा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 03:01 PM IST

ताज्या बातम्या