News18 Lokmat

माओवाद्यांकडून मोठा घातपात, 3 कोटींची वाहनं जाळली

एटापल्ली तालुक्यात रस्त्याच्या कामावर असलेल्या दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर आणि एक डिप्पर माओवाद्यांनी पेटवून दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2018 10:47 AM IST

माओवाद्यांकडून मोठा घातपात, 3 कोटींची वाहनं जाळली

महेश तिवारी, प्रतिनिधी, गडचिरोली, 1 डिसेंबर : गडचिरोली जिल्हात माओवाद्यांनी तब्बल तीन कोटीची वाहनं जाळली आहेत.  एटापल्ली तालुक्यात रस्त्याच्या कामावर असलेल्या दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर आणि एक डिप्पर माओवाद्यांनी पेटवून दिला आहे.

ही घटना बाहेर येऊ नये म्हणून माओवाद्यांनी रस्त्याच्या कामावर असलेल्या मजुरांना डांबून ठेवलं होतं. त्यामुळे काल संध्याकाळी घडलेली ही घटना आज सकाळी समोर आली. एटापल्ली तालुक्यात वट्टेपल्ली ते गट्टेपल्ली दरम्यानची ही घटना घडली आहे.

दरम्यान, सुरक्षा यंत्रणेनं गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांविरोधात आक्रमक मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे चिडलेले माओवादी घातपात घडवू शकतात, असा इशारा देण्यात आला होता. घातपाताची पूर्वसूचना असतानाही प्रशासनाला ही घटना टाळता आली नाही.

सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने खबरदारी घेत ही वाहन रस्त्याच्या बाजूला उभी करणं चुकीचं होतं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या  निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली, असा आरोप होत आहे.

आजपासून शहीद सप्ताह सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवरच माओवाद्यांनी केलेल्या या घातपाताला सुरक्षा यंत्रणा कसं उत्तर देतात, हे पाहावं लागेल.

Loading...


VIDEO : काचेच्या प्लेट उचलून ठेवताना पडल्या अंगावर, श्वास रोखायला लावणार CCTV

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 10:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...