माओवाद्यांनी गडचिरोलीमध्ये का केला हल्ला?

गडचिरोलीमध्ये मागच्या वर्षी माओवादविरोधी कारवाईत 16 माओवादी मारले गेले होते. याचा बदला घेण्यासाठीच माओवाद्यांनी हा हल्ला घडवला, असं बोललं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 04:33 PM IST

माओवाद्यांनी गडचिरोलीमध्ये का केला हल्ला?

गडचिरोली, 1 मे : गडचिरोलीमध्ये जांभूरखेडा भागात माओवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 16 जवान शहीद झाले आहेत. माओवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांना लक्ष्य करत भूसुरुंगांचा स्फोट घडवला. सी -60 कमांडोंच्या पथकाची गाडी गस्तीसाठी जात असताना हा स्फोट घडवण्यात आला.

मागच्या वर्षीच्या कारवाईचा बदला?

या स्फोटात या कमांडोंच्या गाडीचे अक्षरश: तुकडे झाले. 15 जवानांसह गाडीच्या चालकाचाही मृत्यू ओढवला. माओवाद्यांनी केलेला हा हल्ला मागच्या वर्षीच्या माओवादविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी करण्यात आला, असं बोललं जात आहे.

मागच्या वर्षी गडचिरोलीमध्येच माओवादविरोधी कारवाईमध्ये 16 माओवादी मारले गेले होते. 22 एप्रिल 2018 ला एटापल्लीमध्ये माओवादविरोधी पथकाने ही कारवाई तीव्र केली होती. बोरियाच्या जंगलात माओवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या चकमकीत हे माओवादी ठार झाले.

साईनाथ आणि सिनू ठार

Loading...

या कारवाईत माओवाद्यांचा म्होरक्या साईनाथ आणि सिनू यांनाही मारण्यात आलं. माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली. महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षांतली ही सगळ्यात मोठी कारवाई होती. माओवाद्यांनी या कारवाईचा बदला घेण्यासाठीच गडचिरोलीमध्ये हा हल्ला घडवला, याला गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनीही पुष्टी दिली आहे.

गेल्या वर्षीपासून रचत होते कट

22 एप्रिल 2018 ला ही कारवाई झाल्यानंतर माओवादी या हल्ल्याचा कट रचत होते, अशीही माहिती आहे. गडचिरोलीच्या जांभूरखेडा भागात हा हल्ला झाला त्या गाडीत सुमारे 25 जवान होते, अशी माहिती आहे. ही गाडी गस्तीसाठीच निघाली होती. त्यावेळी माओवाद्यांनी ही सुरुंगस्फोट घडवून आणला. यामध्ये गाडीच्या चालकाचाही मृत्यू ओढवला.

दंतेवाडा हल्ला

छत्तीसगडमधल्या दंतेवाडामध्येही 10 एप्रिलला माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपचे आमदार भीमा मांडवी आणि 4 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढवला होता. या हल्ल्यानंतर लगेचच माओवाद्यांनी गडचिरोलीला लक्ष्य केलं.

=======================================================

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची भीषणता दाखवणारा पहिला VIDEOबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2019 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...