गडचिरोली भुसुरुंग स्फोटाचा तपास आता NIA कडे, 15 पोलीस झाले होते शहीद

कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा-लेंडारी गावादरम्यान झालेल्या 1 मे महाराष्ट्र दिनी झालेल्या स्फोटात 15 पोलीस शहीद झाले होते. या भुसुरुंग स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) हाती घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 09:56 PM IST

गडचिरोली भुसुरुंग स्फोटाचा तपास आता NIA कडे, 15 पोलीस झाले होते शहीद

महेश तिवारी, (प्रतिनिधी)

गडचिरोली, 5 जुलै- कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा-लेंडारी गावादरम्यान झालेल्या 1 मे महाराष्ट्र दिनी झालेल्या स्फोटात 15 पोलीस शहीद झाले होते. या भुसुरुंग स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) हाती घेतला आहे. एनआयएचे पथक गडचिरोलीत दाखल झाले आहे. एनआयएच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे.

30 एप्रिलच्या रात्री माओवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील 27 वाहने व अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 मे रोजी जांभूळखेडा-लेंडारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर माओवाद्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला होता. यात 15 पोलिस व एका खासगी वाहनचालक शहीद झाले होते.

राष्ट्रीय तपास यंत्रणा आता भूसुरुंग स्फोटासंबंधीचे महत्त्वाचे दस्ताऐवज व माहिती गोळा करत आहे. जिल्हा पोलिसांकडे सध्या या घटनेचा तपास असून, दोन-तीन दिवसांत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपासासंबंधी सर्व दस्ताऐवज सुपूर्द करण्यात येणार आहेत. या घटनेत आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक

Loading...

कुरखेडा भुसुरुंगस्फोटाच्या प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. या घटनेत अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आलीय. कुरखेडा येथील कैलास रामचंदानी असे त्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तालुका अध्यक्ष होता, असे सांगितले जात आहे. कैलास रामचंदानी एक वर्षापूर्वी तालुका अध्यक्ष होता. मात्र, त्याला निष्क्रीयतेच्या कारणांवरुन पदावरुन काही महिन्यांपूर्वी काढण्यात आले होते, असा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी 'न्युज 18 लोकमत'शी बोलताना केला आहे.

काय झालं होतं 1 मे रोजी?

गडचिरोलीमधील जांभुळखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 15 जवानांसह एक चालक शहीद झाला. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीमधील लोकल एरिया कमिटीने हा हल्ला घडवून आणला होता. यासाठी IDचा वापर आहे.

महाराष्ट्र दिनीच दिवशीच गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूळखेडा गावाजवळील ही घटना घडली. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'नेटवर्क 18 लोकमत'शी संवाद साधताना दिली आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

सापाला पाहून जेव्हा पोलिसाची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2019 09:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...